⁠  ⁠

PNB Recruitment : पंजाब नॅशनल बँकेत मोठी भरती, पदवीधरांसाठी मोठी संधी, पगार 69810

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

PNB Bharti 2022 : बँकेत नोकरी करण्याची योजना आखत असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेत (PNB Recruitment 2022) विविध रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार PNB च्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण पदसंख्या : १०३

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) अधिकारी (अग्नि सुरक्षा): 23 पदे
२) व्यवस्थापक (सुरक्षा): 80 पदे

अधिकारी (अग्नि सुरक्षा): एकूण 23 पदांपैकी 3 पदे SC, एक पद ST, 6 पद OBC, EWS-2 आणि 11 पदे सर्वसाधारणसाठी आहेत.
व्यवस्थापक (सुरक्षा): एकूण 80 पदांपैकी 12 SC, 6 ST, 21 OBC, 8 EWS, 44 सामान्यांसाठी आहेत.

शैक्षणिक पात्रता :
अधिकारी (अग्नि सुरक्षा): मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून बॅचलर पदवी आणि इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स इंडिया/इन्स्टिट्यूट ऑफ फायरमधून पदवीधर
व्यवस्थापक (सुरक्षा): मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून बॅचलर पदवी

वयोमर्यादा :
उमेदवारांची वयोमर्यादा २१ ते ३५ वर्षे दरम्यान असावी.

अर्ज फी :
सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – रु. 1003/-
SC/ST/PWBD श्रेणीसाठी अर्ज शुल्क – रु. ५९/-

इतका मिळेल पगार :
अधिकारी (अग्नि सुरक्षा): 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
व्यवस्थापक (सुरक्षा): 48170-1740/1-49910-1990/10-69810

निवड प्रक्रिया : मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षेत प्रत्येकी 2 गुणांचे 50 प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे आहे आणि कमाल गुण 100 आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० ऑगस्ट २०२२

अधिकृत संकेतस्थळ : pnbindia.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

अर्ज कसा करायचा?
पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर भेट देऊन अर्ज डाउनलोड करू शकतात आणि विहित नमुन्यात खालील पत्त्यावर पाठवू शकतात. “मुख्य व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक (भर्ती विभाग), एचआरडी विभाग, पंजाब नॅशनल बँक, कॉर्पोरेट कार्यालय, प्लॉट नंबर-4, सेक्टर-10, द्वारका, नवी दिल्ली – 110075”.

Share This Article