दारिद्र्य रेषेखालील महिलांना मोफत गॅस जोडणी
नवी दिल्ली- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील महिलांना स्वयंपाकाच्या गॅसचा जोड (कनेक्शन) मोफत देण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने गुरुवार, 11 मार्च 2016 रोजी मंजूर केली. या योजनेसाठी 8 हजार कोटी रूपयांचा बोजा सरकारवर पडणार आहे. काही राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या लोकप्रिय योजना मंजूर करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वल योजना असे या योजनेचे नाव असून, तीन वर्षांसाठी याला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री धर्मेश प्रधान यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या चुलींमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी, तसेच महिला सबलीकरण म्हणून या स्तरातील महिलांना मोफत कनेक्शन दिली जाणार असून पहिल्या वर्षात त्यासाठी अर्थसंकल्पात २ हजार कोटींची तरतूद केली गेली आहे. पहिल्या वर्षात १ कोटी ५० लाख क नेक्शन दिली जातील तर तीन वर्षाच्या कालावधीत हीच संख्या ५ कोटींवर जाणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
सोर्स – सकाळ
Prime Minister Ujjwala Yojana
Pradhanmantri Ujjwala Yojana
Free LPG scheme for womenes