---Advertisement---

आरतीच्या अंगावर अभिमानाची वर्दी अन् गावाची ठरली शान !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

PSI Success Story एखाद्या गावात राहून देखील अनेक मुली हुशार असतात. पण त्यांच्या स्वप्नांना वाट मिळत नाही. पण जुन्नर तालुक्यातील आणे गावात राहून देखील आरती सासवडे ही ओबीसी संवर्गातून महिलांमधून राज्यात दुसरा क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड देखील झाली आहे.

इतकेच नाहीतर ती गावातील पहिली महिला अधिकारी ठरली असून वयाच्या २४ व्या वर्षी तिने यश मिळवले आहे.

आरतीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आणे व माध्यमिक शिक्षण श्री रंगदास स्वामी माध्यमिक आश्रमशाळा, आणे येथे झाले आहे. तिने शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था, औरंगाबाद येथून बीएससी फॉरेन्सिक सायन्स मधून पदवी मिळवली आहे.

पदवी परीक्षा झाल्यावर तिने स्पर्धा परीक्षा करण्याचा ध्यास घेतला. तो ध्यास पूर्ण करण्यासाठी ती दिवसरात्र मेहनत करायची. त्यामुळेच, २०१९ मध्ये झाल्या एमपीएससी पूर्व आणि मुख्य परीक्षेतून तिची निवड झाली आहे. शारीरिक चाचणी आणि मुलाखत नोव्हेंबर २०२१ मध्ये झाली. या परीक्षेत तिने ३४० पैकी २३५ गुण मिळवले आहेत. ही संपूर्ण गावासाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts