⁠
Inspirational

दुर्गम डोंगरी भागातील तरुणाची MPSC परीक्षेत बाजी, पहिल्याच प्रयत्नात झाला PSI..

PSI Success Story : मेहनत करण्याची तयारी असेल तर यश हे मिळतेच हे कैलास याने दाखवून दिले आहे. त्याने कठीण काळातही शिक्षण व अभ्यासाची गोडी कमी होऊ दिली नाही व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आपले ध्येय गाठले. पहिल्याच प्रयत्नात एमपीएससीच्या परीक्षेत यश संपादन करीत अवघ्या चोवीसाव्या वर्षी पोलिस उपनिरीक्षकपद मिळवले.

तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन वसाहतीतील रमेश पावरा व चिकीबाई पावरा यांचा मुलगा कैलास पावरा. त्याने जि. प. शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले. पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण धुळे जिल्ह्यातील मोराणे येथील श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालयात घेतले.त्यानंतर जळगाव येथील मुळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेत पदवीचे शिक्षण घेतले.

आई-वडिलांसोबत मजुरी, मेहनत करून शिक्षण सुरू ठेवले. त्याचबरोबर आई-वडिलांना हातभार लावला. त्यांच्या मोठा मुलाचेही शिक्षण झाले असून सध्या तो बांधकाम व्यवसायात कुशल कारागीर आहे तर मुलीचेही पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले आहे.कैलास पावरा यांनी लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षा द्यायची अशी खूणगाठ बांधली होती. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने त्यांनी कोणताही क्लास न लावता सेल्फ स्टडीवर भर दिला.

आपल्या कार्यकर्तृत्वातून सामान्यांना न्याय मिळावा यासाठी त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जोमाने केला. आपण अधिकारी होऊन दाखवले तर गाव व परिसरातील तरुण, तरुणी अधिकारी होतील हे मनाशी पक्के केले आणि मैदानी चाचणीत शंभर पैकी ९३ गुण घेऊन आपले वर्चस्व सिद्ध केले.इतकेच नाही तर एमपीएससीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात बाजी मारत यशाला गवसणी घातली.

Related Articles

Back to top button