---Advertisement---

चप्पल – जोडी शिवणाऱ्या कामगाराची लेक झाली पोलिस उपनिरीक्षक!

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

PSI Success Story : गावातील वातावरण त्यात घरामध्ये अभ्यासासाठी सोय नसताना सुद्धा खुशबूने स्वत: कष्ट करून, त्रास भोगून स्पर्धात्मक परीक्षेचे कोणतेही वर्ग न लावता एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.

खुशबूचे वडील प्रल्हाद बरैय्या हे अर्जुनी शहराच्या ठिकाणी चप्पल, जोडे शिवण्याचे काम करतात. त्या मोलमजुरीवर आपल्या कुटुंबाचा गाडा चालवितात. तिची आई सतत आजारी असूनही दोघी दांपत्यांनी मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. शिक्षणापासून प्रगती नाही, ही जाण त्यांना पदोपदी जाणवत होती.आपले मुले शिक्षण घेऊन शासकीय पदावर कार्यरत राहावे, अशी त्यांची अपेक्षा होती.त्यानुसार त्यांनी खुशबूला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

अर्जुनी मोरगाव येथील वाचनालयात नियमितपणे वाचन, लेखनाचा सराव केल्याने हिला हे यश संपादन झाले आहे.
अवघ्या दोन खोल्यांच्या घरात हे सारं कुटुंब राहतं. कोणतीही सुखसोयी उपलब्ध नसताना चिकाटीच्या जोरावर स्वप्नांसाठी अथक परिश्रम घेत राहिली.

जेव्हा पोलिस उपनिरीक्षकपदाची यादी जाहीर करण्यात आली. त्यात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील खुशबू प्रल्हाद बरैय्या या युवतीने ३६४ गुण मिळवून पोलिस उपनिरीक्षक पदावर आपले स्थान निश्चित केले. खुबशूच्या या असामान्य यशाबद्दल तिचे कौतुक केले जात आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts