---Advertisement---

“मी कपडे विकायला जातो पण आता लोक PSI चे वडील म्हणून ओळखतात”

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

PSI Success Story : हे वाक्य किती जगण्याचे गमक सांगून जातंय. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जळगावातील कोमल सोपान शिंदे हिने नुकतीच पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत यश मिळवले आहे.  

घरी कोणतीही अनुकूल परिस्थिती व वातावरण नव्हते तरी आपण एक दिवस अधिकारी होणार हे स्वप्न साकार करण्यासाठी तिने अहोरात्र कष्ट घेतले. कोमलचे वडील सोपान शिंदे हे दुचाकीवर गावोगावी जाऊन कपडे विक्री करतात. तेव्हा तेलोक पीएसआयचे वडील म्हणून हाक मारतात. ही त्यांच्यासाठी बहुमोलाची पदवी आहे.  कोमलची आई देखील जळगाव शहरातील जैन इरिगेशन कंपनीमध्ये कामगार आहे. कोमलने वाणिज्य शाखेतून पदवी घेतल्यानंतर एमएसडब्ल्यू पूर्ण केले. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली.

---Advertisement---

तिला पहिल्याच प्रयत्नात यश आले नाही. मग पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पुन्हा अर्ज भरला. या काळात ती १२-१२ तास अभ्यास करायची, मला कामात सुध्दा मदत करायची. व्हॉटस्ॲप असो की मोबाईल ती लांब होती. सप्टेंबर २०२२ मध्ये परीक्षा दिली. आताच्या निकालात तिला PSI हे पद मिळाले. 

    आपली पार्श्वभूमी कोणतीही असली तरी सातत्याने अभ्यास केला तर कष्टाचं चीज होते. त्यामुळे भविष्यातील हीच परिस्थिती बदलण्यासाठी उपयोग होते, हे कोमलने दाखवून दिले आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts