घर, मूले आणि शेती अशी तिहेरी कसरत करत जिद्दीने वैशाली बनल्या फौजदार !
PSI Success Story शेतीची कामे सांभाळत, स्पर्धा परीक्षेची तयारी करणे खरंच शक्य आहे का? पण वैशाली कोळी यांनी करून दाखवले आहे. सोलापूर तालुक्यातील माळकवठे येथे राहणाऱ्या वैशाली कोळी यांना पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळाले आहे.
त्या दिवसभर शेतातील कामे करून घरची सर्व कामे आवरत. परत मुलांची देखभाल…असे असताना देखील त्यांनी काम केल्यानंतर मिळेल त्या वेळेत अभ्यास करायच्या. सुरुवातीच्या काळात शेतकरी कुटूंबात असल्याने कसेबसे शिक्षण पूर्ण केले.
२०१३ मध्ये प्रकाश कोळी यांच्या सोबत लग्न झाल्यानंतर त्यांनी उर्वरित शिक्षण पूर्ण केले. वैशाली यांनी लग्नानंतर एम.एस्सी, बी.एड शिक्षण घेतले. सुरुवातीला तुटपुंज्या पगारावर खाजगी संस्थेत नोकरी देखील केली. त्यांनंतर त्यांनी जिद्दीने अभ्यास केला, सोबत गावातच राहून मैदानी सराव देखील केला. या जिद्दीमुळे त्यांना पोलिस उपनिरीक्षक हे पद मिळाले आहे.
मित्रांनो, लग्नानंतर पण मुलींना पाठिंबा दिला तर मुली देखील नक्कीच उच्च पद मिळवू शकतील.