---Advertisement---

‘एमपीएससी’ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

Schedule for Mpsc Exam Announced

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यात राज्य सेवा परीक्षेसह अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसह कृषी सेवा परीक्षेचा समावेश आहे.

आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यसेवा परीक्षेतील पूर्वपरीक्षा ५ एप्रिल तर मुख्य परीक्षा ८, ९ व १० ऑगस्ट रोजी होणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा १ मार्च तर मुख्य परीक्षा १४ जून रोजी घेतली जाईल. सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा १५ मार्च तर मुख्य परीक्षा १२ जुलै रोजी होणार आहे.

---Advertisement---

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा १० मे तर मुख्य परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी असेल. महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेत ५ जुलै रोजी पूर्व परीक्षा तर १ नोव्हेंबर रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी पदासाठी पूर्व परीक्षा ३ मे रोजी घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक-एकची मुख्य परीक्षा ६ सप्टेंबर, पोलीस उप निरीक्षक पद मुख्य परीक्षा १३ सप्टेंबर, राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २७ सप्टेंबर तर सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १७ मे रोजी होणार आहे तर स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा १८ ऑक्टोबर रोजी होईल. गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ७ जून रोजी होणार आहे. संयुक्त पेपर क्रमांक-एकची मुख्य परीक्षा २९ नोव्हेंबर, लिपिक-टंकलेखक मुख्य परीक्षा ६ डिसेंबर, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट-क मुख्य परीक्षा १३ डिसेंबर रोजी तर कर सहायक मुख्य परीक्षा २० डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

1 thought on “‘एमपीएससी’ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर”

Comments are closed.