परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालये उपलब्ध न केल्यास कारवाई
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीसाठी दरवर्षी राज्यातील लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाच्या मागणीनुसार शासकीय सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत वेळोवेळी परीक्षांचे आयोजन केले जाते. या परीक्षांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये व्यवस्था केली जाते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून मागणी करूनही बहुतांश शाळा व महाविद्यालये या परीक्षांसाठी नकार देत असल्याची बाब समोर आली आहे.
शाळा, महाविद्यालयाकडून या महत्वाच्या परीक्षेसाठी होणाऱ्या असहकारामुळे परीक्षेच्या आयोजनावर परिणाम होतो. ही बाब विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांकरिता मागणीनुसार शाळा, महाविद्यालये उपलब्ध करून द्यावीत अन्यथा त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे निर्देश शिक्षण संचालकांनी परिपत्रक काढून दिले आहेत. राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुट्टीच्या दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकरिता मागणीनुसार उपलब्ध करून द्यावीत अन्यथा त्याांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.
नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.