⁠  ⁠

वयाच्या १९व्या वर्षी शेतकरी पुत्राची भारतीय नौदलात निवड !

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

एखाद्या ग्रामीण भागातील तरूण जेव्हा देशसेवेसाठी गरूडझेप घेतो… तेव्हा तो संपूर्ण गावाचा अभिमान असतो.
असाच राजापूर गावातील शेतकरी कुटुंबात वाढलेला हर्षल घुले.

हर्षलचे शालेय शिक्षण ‌हे राजापूरच्या भैरवनाथ वस्तीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. तर व माध्यमिक विद्यालयात आपले बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मुलांना शालेय शिक्षण व्यवस्थित मिळावे आणि कसलीच कमी पडू नये, याची काळजी संपूर्ण कुटुंबाने वेळोवेळी घेतली. घरची परिस्थिती बेताची असल्याने हर्षलचे आजोबा लक्ष्मण घुले मुलांना घेऊन राजापूर येथील आनंदा चव्हाण या मामाकडे आले. त्यामुळे त्याचे शालेय शिक्षण राजापूर या गावात झाले.

हर्षलच्या आजी इंदुबाई, आजोबा लक्ष्मण घुले यांनी गवत विकून आपल्या संसाराचा गाडा चालविला. पुढे संतोष व भाऊसाहेब व हर्षलची आई शिनाबाई, काकी मनीषा यांनी चिकाटी व मेहनतीने मुलांना शिक्षणासाठी मदत केली.

तसे मूळचे कूसमाडी येथील असलेले घुले कुटुंब. पण वडिलांच्या याच संस्कार व कष्टाची जाणीव ठेवत हर्षलने शेती करत शिक्षण पूर्ण केले.पुढे पुणे येथे एनडीए डिफेन्स अकॅडमीत त्याने शिक्षण घेत प्रतिकूल परिस्थितीत संघर्षाच्या जोरावर नौदलातील यशाला गवसणी घातली आहे.या कुटुंबाने शेतीत अहोरात्र कष्ट करत आपल्या कुटुंबाची घडी बसवली. विशेष म्हणजे या परिसरात नौदलात सेवेत सहभागी झालेला तो पहिला तरुण ठरला. वयाच्या १९ व्या वर्षी थेट नौदलात नोकरी लागल्याने संपूर्ण गावाला त्याचा अभिमान आहे. हा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. अभ्यास – भरती प्रक्रिया हे संपूर्ण तारेवरची कसरत होती. पण हर्षल याचे कष्टाचे चीज केले.प्रतिकूल परिस्थितीत संघर्षातून त्याने घेतलेली गरुड झेप अख्खा गावाला अभिमानाची ठरला.

Share This Article