ठाणे महानगरपालिकेत पदवीधरांसाठी नोकरीची संधी

Published On: एप्रिल 7, 2021
Follow Us

तुम्ही जर पदवी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. ठाणे महानगरपालिका, ठाणे येथे मार्कर पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन करायचा असून अर्ज सुरु होण्याची तारीख 7 एप्रिल 2021 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.

एकूण जागा : ०२

पदांचे नाव : मार्कर (Marker)

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर पास असणे आवश्यक ०२) राष्ट्रीय व राज्यस्तरीयस्पर्धा आयोजनाचा अनुभव ०३) ०३ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

अर्ज शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १६,९५३/- रुपये.

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2021

विशेष सूचना :-

१) अधिकारी/कर्मचारी शारीरीक दृष्टया सक्षम असावा.
२) करार पध्दतीने निवड करावयाच्या अधिकारी/कर्मचारी यांनी विहीत नमुन्यातील वचनपत्र भरुन देणे आवश्यक आहे.
३) पदभरतीच्या अटीशर्तींमध्ये परिस्थितीनुसार बदल करण्याचे अधिकार मा.महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांना राहिल.
४) महापालिकेससादरकरण्यात आलेली सर्व कागदपत्रे / अभिलेखे ही महापालिकेच्या अभिलेखाचा भाग होईल.
५) जर एखाद्या उमेदवाराने कंत्राटी भरती कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुचित माध्यमांचा अवलंब केल्याचे किंवा तोतया व्यक्तींची व्यवस्था केल्याचे आढळल्यास त्याला निवडीतून अपात्र ठरविण्यात येईल.
६) यापुर्वी सदर पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी या जाहिरातीस अनुसरुन पुन्हा अर्ज करणे आवश्यक आहे.
७) उमेदवाराने त्याच्या हितासाठीखोटी व चुकीची माहिती तपशील देऊ नये. खोटी माहिती तथा खोटातपशीलतयार करुन सादर करु नये किंवा कोणतीही माहिती ऑनलाईन अर्ज भरताना दडवून ठेवू नये.
८) करार पध्दतीवरील उमेदवारांना नियमित नियुक्तीसाठीकोणताहीहक्क सांगता येणार नाही.

अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now