UPSC IAS Success Story लग्नानंतर अनेक महिलांच्या जीवनात मोठे बदल घडून येतात. काही त्यांचे करिअर मागे टाकतात आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दडपणात जगत असतात. मात्र, सासर आणि नवऱ्याच्या समजूदार असेल, जिद्द उराशी असेल महिलांना लग्नानंतरही यश मिळू शकते. अशीच अधिकारी पुष्पलता यादव यांची प्रेरणादायी यशोगाथा नक्की वाचा…त्यांनी आपल्या पतीच्या अखंड पाठिंब्याने आपल्या कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पुष्पलता यांनी लग्नानंतर २०१७ मध्ये युपीएससी म्हणजे नागरी सेवा परीक्षेत ८० वा क्रमांक मिळविला. त्या मूळच्या हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील खुसबुरा या छोट्याशा गावातल्या…. त्यांचे संपूर्ण शालेय शिक्षण गावातच पूर्ण केले. त्यांनी २०१६ मध्ये बी.एस्सी पदवी पूर्ण केल्यानंतर आणि त्यानंतर एमबीएची निवड केली.एमबीए पूर्ण केल्यानंतर पुष्पलता आपला खर्च भागवण्यासाठी एका खाजगी कंपनीत काम करू लागल्या. खासगी क्षेत्रातील नोकरीसोबतच तिने दोन वर्षे सरकारी नोकरीच्या तयारीसाठी दिले. या मेहनतीचे फलीत म्हणून त्यांना स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून पद मिळवले. पण त्यांचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी मेहनत सुरू केली. म्हणूनच त्यांनी स्टेट बँक ऑफ हैदराबादमधील पदाचा राजीनामा देखील दिला.
या संपूर्ण प्रवासात दोन वर्षांच्या मुलाची आई म्हणून तिच्या जबाबदाऱ्यांचा समतोल साधत पुष्पलता यांनी अनेक आव्हानाचा सामना केला. त्या पहाटे चार वाजता उठायच्या आणि काही वेळ अभ्यास करायच्या आणि नंतर मुलाला शाळेत पाठवायच्या आणि तो गेल्यावरही अभ्यास करायच्या. शाळेतून आल्यावर त्याला झोपवून अभ्यास करायच्या.
पुढे त्यांनी यूपीएससीचा पेपर लिहिण्यासाठी जवळपास चार वर्षे तयारी केली. दोनदा अपयशी ठरल्या पण त्यामुळे निराश झाल्या नाही. त्यानी अभ्यास सुरू ठेवला आणि आणखी लक्ष केंद्रित केलं. या संपूर्ण त्यांच्या कुटुंबाने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. शेवटी तिसऱ्या प्रयत्नात त्या सिव्हिल सर्व्हिसेसचा पेपर पास होण्यात यशस्वी शस्वी झाल्या आणि आयएएस अधिकारी बनल्या.
मित्रांनो, आयुष्यात कितीजरी अडचणी असल्या तरी स्वप्न पूर्ण करण्याची तयारी असेल तर यश हे मिळतेच. त्यामुळे, एकमेकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठिंबा देणे आवश्यक आहे.