⁠  ⁠

अवघ्या तेवीसाव्या वर्षी स्मिता यांची IAS ऑफिसर पदी नियुक्ती!

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

UPSC IAS Success Story : अनेकांसाठी युपीएससीची (नागरी सेवा परीक्षा) उत्तीर्ण होणे हे आयुष्यभराचे ध्येय असते. ते त्यांच्या तयारीसाठी अनेक वर्षे अभ्यास करतात. यात काहीच टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात तर काहीजण हार मानतात आणि इतर ध्येयांच्या मागे लागतात. युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी एक म्हणजे स्मिता सभरवाल, अवघ्या बावीसावव्या वर्षी, IAS स्मिता सभरवाल युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भारतातील सर्वात तरुण महिला IAS अधिकारी ठरली. स्मिता ही एक सेवानिवृत्त आर्मी कर्नलची मुलगी आहे. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे झाला आहे. स्मिताचे शालेय शिक्षण सेंट ॲनमध्ये झाले.

त्यानंतर सेंट ॲन्स, मरेडपल्ली, हैदराबाद येथून बारावी पूर्ण केली. त्यानी आयसीएसई बोर्डातून बारावीमध्ये ऑल इंडिया फर्स्ट रॅंक मिळवला होता. त्यानंतर त्यांनी सेंट फ्रान्सिस डिग्री कॉलेज फॉर वुमनमधून बी.कॉम केले. पुढे त्यांनी हैदराबादमधील सेंट फ्रान्सिसमधून वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पूर्णपणे स्पर्धा परीक्षा देण्यासाठी लक्ष केंद्रित केले.

त्या तयारीसाठी स्मिता या दररोज ६ तास अभ्यास करत असे. तर अभ्यासाचा ताण कमी व्हावा यासाठी त्या काहीवेळ इतर इतर उपक्रमात देखील भाग घेत. त्याचा उपयोग त्यांना मुलाखतीच्या वेळी झाल्या. नागरी सेवा परीक्षेत स्मिता पहिल्याच प्रयत्नात IAS प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही. २००० मध्ये तिच्या दुसऱ्या प्रयत्नात, तिने केवळ परीक्षा उत्तीर्णच केली नाही तर चौथा रॅंक मिळवला. तिने तेलंगणातील इतर ठिकाणी वारंगल, विशाखापट्टणम, करीमनगर आणि चित्तूर येथे पदे भूषवली आहेत. तसंच ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि मिशन भगीरथ यामधील कामगिरीमुळे स्मिता यांना पिपल्स ऑफिसर म्हणूनही ओळखलं जाते. कामातून मिळालेली ही ओळख खरंच कौतुकास्पद आहे.

Share This Article