गंभीर आजारावर मात करत ती लढली अन् युपीएससी परीक्षेत मारली बाजी
UPSC Success Story : स्पर्धा परीक्षेसाठी दिवसरात्र मेहनत…सेरेब्रल पाल्सी सारख्या गंभीर आजाराशी झुंज…फक्त तीनच बोटं काम हे वाचलं तरी अंगावर शहारे उभे राहतात. शारीरिक दृष्ट्या बऱ्याच अडचणी आणि समस्या असूनही केरळच्या कोझिकोड येथील सारिकाने युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.सारीका केरळच्या कोझिकोड येथील रहिवासी आहे. ती सेरेब्रल पाल्सी सारख्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे.तिचे फक्त तीनच बोटं काम करत आहेत. ती तिच्या उजव्या हाताचा वापर करू शकत नाही.
व्हिल चेअरला कंट्रोल करण्यासाठी तिला डाव्या हाताचा वापर करावा लागतो. ती चालू फिरू शकत नाही. एवढी मोठी अडचण असूनही तिने अहोरात्र मेहनत घेतली.पदवी घेतल्यानंतर तिने यूपीएससी परीक्षेची तयारी केली होती. तिने ऑनलाईन क्लासही लावले होते. पण यात तिला आई – वडिलांचा संपूर्ण पाठिंबा मिळाला. ती ऑनलाईनव्दारे अभ्यास करायची. तिला परीक्षा देण्यासाठी रायटर मिळाला होता. प्रीलिम्स कोझिकोडमध्ये झाल्या होत्या. मेन्स एक्झाम तिरुवनंतपुरममध्ये झाली. तिला या ठिकाणी आठवडाभर राहावं लागलं. त्यासाठी आईवडिलांनी घर भाड्याने घेतलं होतं.
सारिकाचे वडील सौदी अरबमध्ये कतारमध्ये नोकरी करतात. पण तिच्या परीक्षेसाठी म्हणून ते भारतात आले. दिल्लीत मुलाखत झाली. त्यावेळी ती केरळ हाऊसमध्ये राहिले होते. त्यावेळीही तिच्यासोबत आईवडील होते. त्यांनी तिला पूर्ण सहकार्य केलं. सारिकाच्या वडिलांचं नाव संशींद्रन आहे. तर आईचे नाव राकिया आहे. तिला एक छोटी बहीण आहे. तिने युपीएससीची परीक्षा पास करण्यासाठी सारीकाने प्रचंड संघर्ष केला. केवळ परीक्षेपुरताच तिचा संघर्ष नव्हता तर तिचा संघर्ष हा वैयक्तिक पातळीवरचाही होता.
असे असूनही अनेक अडचणींचा सामना करून तिने सिव्हिल सेवेत जाण्याचं आपले व आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण केले . सारिका अवघी २३ वर्षाची आहे. यूपीएससीच्या परीक्षेत तिने ९२२ वी रँक मिळवली आहे. तिचा हा प्रवास अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.