अवघ्या 23 व्या वर्षी UPSC परीक्षेत यश ; सर्वांत तरुण महिला प्रशासकीय अधिकारी !

Published On: सप्टेंबर 8, 2023
Follow Us

UPSC Success Story : स्मिता या मूळच्या दार्जिलिंग इथल्या आहेत. त्यांचे वडील कर्नल पी. के. दास निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. त्या स्वतःला ‘Army Brat’ असं म्हणतात. अनेक वर्षं अभ्यास करूनसुद्धा अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळवता येत नाही. पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होणारे तर अगदी थोडे असतात. पण अवघ्या २३ व्या वर्षी यूपीएससी परीक्षेत मिळवलेल्या स्मिताचा यांचा प्रवास कौतुकास्पद आहे.

स्मिता यांनी हैदराबादच्या मरेडपल्ली भागातल्या सेंट अ‍ॅन्स शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण घेतलं, तर सेंट फ्रान्सिस डिग्री कॉलेजमधून त्यांनी बी.कॉम पूर्ण केलं. त्या नंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली.यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेसाठी २००० साली त्यांना आधी अपयश आलं. मात्र नंतर २००१ मध्ये त्यांनी यूपीएससी AIR ४ मिळवून उत्तीर्ण केली. अवघ्या २३ व्या वर्षी त्यांनी हे यश मिळवलं. त्यानंतर मसूरीला प्रशिक्षण घेतलं. त्याआधी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेतही त्या देशात पहिल्या आल्या होत्या.

आयएएस स्मिता सभरवाल सध्या तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात प्रशासकीय अधिकारी आहेत. मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सचिव म्हणून त्या काम पाहतात. मिशन भगीरथ विभागातल्या ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या सचिवपदाची अतिरिक्त सूत्रं त्यांच्याकडे आहेत.

वारंगळ जिल्ह्याच्या आयुक्त असताना त्यांनी ‘फंड युअर सिटी’ सारखी महत्त्वाकांक्षी योजना राबवली. यात लोकसहभागातून त्यांनी ट्रॅफिक जंक्शन, पादचारी पूल, बस स्टॉप्स, उद्यानं सुरू केली. त्यानंतर विशाखापट्टण इथं व्यावसायिक कर विभागाच्या उपायुक्त म्हणून त्यांनी काम पाहिलं.नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असणाऱ्या सभरवाल यांना म्हणूनच ‘द पीपल्स ऑफिसर’ अशी ओळख मिळाली आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025