चालू घडामोडी : ०८ मार्च २०२१

Published On: मार्च 8, 2021
Follow Us
current affairs 08 march 2021

‘फोगट’ कन्येने जिंकले सुवर्णvinesh phogat 2

भारतीय स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने मट्टे पेलेकोन रँकिंग मालिका स्पर्धेत सलग आठवड्यांमध्ये दुसरे सुवर्णपदक जिंकले आणि तिच्या गटात अव्वल स्थान मिळवले.
जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी २६ वर्षीय विनेश टोकियो गेम्ससाठी पात्र ठरणारी एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे. विनेशने ५३ किलो वजनी गटात कॅनडाच्या डायना मेरी हेलन वेकरला ४-० ने हरवले.
गेल्या आठवड्यात विनेशने किवमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
स्पर्धेत प्रवेश करताना तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या विनेशने १४ गुणांची कमाई करत जागतिक क्रमवारीत आपले प्रथम स्थान परत मिळवले. विनेशने या स्पर्धेत एकही गुण गमावला नाही. शनिवारी सरिता मोरने ५७ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले होते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now