चालू घडामोडी : १३ डिसेंबर २०२०
Current Affairs : 13 December 2020
डॉक्टरांना दहा वर्ष द्यावी लागणार शासकीय रुग्णालयात सेवा
उत्तर प्रदेशात शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची संख्या कमी असून, डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
वैद्यकीय पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणं अनिवार्य असतं.
तर उत्तर प्रदेश सरकारने डॉक्टरकीची पदवी घेतल्यानंतर 10 वर्षे शासकीय रुग्णालयात काम करणं सक्तीचं केलं आहे. जर मध्येच सेवा सोडली, तर डॉक्टरांना 1 कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे.
उत्तर प्रदेशात सध्या वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रामीण एक वर्ष नोकरी केल्यास 10 अंकांची सूट दिली जाते.
तर दोन वर्ष सेवा केल्यास 20 अंकांची सूट देण्यात येते. त्याचबरोबर डॉक्टर पदव्युत्तर अभ्यासक्रमाबरोबरच इतर प्रमाणपत्र अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेऊ शकतात.
एमआयटीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बालश्री पुरस्कार
एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील एमआयटी स्कूल ऑफ फाइन आर्ट्स आणि अप्लाइड आर्ट््स विद्यार्थी जॉयॉन मजुमदार आणि सुमीत प्रजापती यांना राष्ट्रीय बाल भवन, नवी दिल्ली यांच्यातर्फे देण्यात येणारा यंदाचा राष्ट्रीय बालश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रपती यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना गौरवण्यात येते, मात्र यंदा कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे हे पुरस्कार विजेत्यांच्या घरी पोस्टांनी पाठवण्यात आले आहे.