नाशिक महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध १८ संवर्गांतील २०४ रिक्त पदे मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरली जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. उमेदवारांना २५ नोव्हेंबर २०२६ पासून अर्ज करता येणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २ डिसेंबर २०२६ आहे.
एकूण रिक्त जागा : २०४
पदांची नावे :
- वैद्यकीय अधिकारी
- शल्यचिकित्सक
- स्त्रीरोगतज्ज्ञ
- अस्थिरोगतज्ज्ञ
- बालरोगतज्ज्ञ
- क्ष-किरण तज्ज्ञ
- बधिरीकरण तज्ज्ञ
- त्वचारोगतज्ज्ञ
- मानसोपचारतज्ज्ञ
- फिजिओथेरपिस्ट
- स्टाफ नर्स
- ए.एन.एम.
- मिश्रक
- कुष्ठरोग तंत्रज्ञ
- शस्त्रक्रियागृह तंत्रज्ञ
- ईसीजी तंत्रज्ञ
- बायोमेडिकल इंजिनिअर
- संगणक ऑपरेटर
अटी व शर्ती
१. संबंधित पदासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता, व्यावसायिक पात्रता व आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण धारण करणे उमेदवारासाठी बंधनकारक राहील.
२. वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ, स्टाफ नर्स व इतर संबंधित पदांसाठी आवश्यकतेनुसार संबंधित वैद्यकीय परिषद, नर्सिंग परिषद अथवा सक्षम प्राधिकरणाकडील वैध नोंदणी प्रमाणपत्र असणे अनिवार्य राहील.
३. उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक अर्हता, नोंदणी, अतिरिक्त अर्हता, प्रशिक्षण व अनुभवासंबंधीची सर्व वैध प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक राहील.
४. अनु.क्र. १ ते १० या पदांकरिता उमेदवारांचे वय ६० वर्षापेक्षा जास्त नसावे, तसेच अनु.क्र. ११ ते १८ या उमेदवारांसाठी वय ४३ पेक्षा जास्त नसावे.
५. बालरोगतज्ज्ञ (Pediatrician) पदासाठी नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) मधील प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. त्याबाबतचे कामाचे स्वरूप, अनुभवाचा कालावधी व संबंधित संस्थेची माहिती अनुभव प्रमाणपत्राद्वारे स्पष्ट होणे आवश्यक राहील.
६. वैद्यकीय अधिकारी व स्टाफ नर्स या पदांसाठी ICU प्रशिक्षण अथवा ICU मधील प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. तथापि, संबंधित पदासाठी विहित केलेली मूलभूत शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पूर्ण करणे अनिवार्य राहील.
७. अनुभवाचा दावा करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने संबंधित संस्थेने सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत निर्गमित केलेले वैध अनुभव प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. अनुभव प्रमाणपत्रामध्ये संस्थेचे नाव व पत्ता, पदनाम, सेवाकालावधी, कामाचे स्वरूप, संबंधित विभागाचे नाव तसेच प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याचे नाव, पदनाम, स्वाक्षरी व संस्थेचा शिक्का असणे आवश्यक राहील.
८. ICU, NICU व शस्त्रक्रियागृहातील अनुभवाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विभागातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव दर्शविणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. आवश्यकतेनुसार संबंधित विभागाची उपलब्धता, रुग्णालयाची खाटक्षमता व उमेदवाराच्या कर्तव्यांची पडताळणी करण्यात येईल.
९. उमेदवाराने सादर केलेल्या अनुभव प्रमाणपत्रांसह सर्व शैक्षणिक, व्यावसायिक व इतर आवश्यक कागदपत्रांची मूळ कागदपत्रांशी पडताळणी करण्यात येईल. आवश्यकतेनुसार संबंधित संस्थेकडून प्रमाणपत्रांच्या सत्यतेची खातरजमा करण्यात येईल.
१०. खोटी, बनावट, दिशाभूल करणारी अथवा अपूर्ण माहिती असलेली कागदपत्रे सादर केल्याचे आढळल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी/निवड रद्द करण्याबाबत तसेच नियमानुसार पुढील
११. वैध व पडताळणीयोग्य कागदपत्रांद्वारे सिद्ध न होणारा अनुभव ग्राह्य धरण्यात येणार नाही.
१२. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती नाशिक महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील कोणत्याही रुग्णालयात, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात, आरोग्यवर्धिनी केंद्रात अथवा अन्य आरोग्य संस्थेत प्रशासकीय व रुग्णसेवेच्या आवश्यकतेनुसार करण्यात येऊ शकते.
१३. सदर नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची व मानधन तत्त्वावरील असेल. नियुक्तीचा प्रारंभिक कालावधी ६ महिन्यांचा राहील. सदर नियुक्तीमुळे उमेदवारास महानगरपालिकेच्या नियमित सेवेत समाविष्ट होण्याचा अथवा कायमस्वरूपी नियुक्तीचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही.
१४. अर्जामध्ये दिलेली माहिती व सादर केलेली सर्व कागदपत्रे सत्य व अचूक असणे आवश्यक राहील.
१५. पात्रता, अनुभव, अतिरिक्त अर्हता, नोंदणी व इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच अंतिम निवड करण्यात येईल.
किती पगार मिळेल?
या भरतीतील शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १ लाख १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. वैद्यकीय अधिकारी पदासाठी ७५ हजार रुपये, तर स्टाफ नर्स, एएनएम, मिश्रक आणि संगणक ऑपरेटर पदांसाठी दरमहा २३ हजार ४५५ रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे.
परीक्षा फी : नमुद नाही
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : २ डिसेंबर २०२६
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण :- सार्वजनिक आरोग्य विभाग, ३ रा मजला. राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक
कार्यालयीन सुटटी व सार्वजनिक सुटटी वगळून सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत अर्ज स्विकारण्यात येतील.
अधिकृत संकेतस्थळ : https://nmc.gov.in/home/news
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा









