आदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला
आदिवासी पावरा समाज तसा तर शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला. अशा समाजातून छोट्याशा खेड्यातून येऊन एमपीएसीत घवघवीत यश प्राप्त करून चांगल्या पदावर पोहोचलेला माणूस. उत्तुंग ध्येयासक्तीने झपाटलेला हा माणूस एवढ्यावरच थांबला नाही. पोलीस दलात काम करत 35 व्या वर्षी यूपीएससीची तयारी केली आणि त्यातही उत्तुंग यश मिळविले. या ध्येयवेड्या अफाट माणसाचं नाव अजय खर्डे. स्वतःच्या यशाच्या आनंदात विरघळून न जाता आपल्या समाजातील अनेक मुलांनी अधिकारी व्हावे ही भावना ठेवून त्यांच्यासाठी मोफत अभ्यास वर्ग सुरु करणार्या अवलिया माणसाची ही कहाणी. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात जळगाव जिल्हा पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक असणारे अजय खर्डे यांनी 975 रँक मिळविली आहे.
अभ्यासासाठी टाळले सण-समारंभ
वैद्यकीय रजा व वेळोवेळी मिळणार्या सुट्यांचा सदुपयोग केला. गेल्या वर्षभरात समारभांत व गावाकडे जाणे टाळले. त्यामुळेच अभ्यासाला पुरेसा वेळ देवू शकलो. स्वत:च्या नोट्स व अभ्यास पद्धती विकसीत केली. मुक्त विद्यापीठातुन राज्यशास्त्रात पदवी घेतल्याने युपीएसएसी देखील राज्यशास्त्रात या विषयाची निवड केली. मराठी भाषा असली तरी हिंदी व इंग्रजी संदर्भ ग्रथांवर भर दिला.
सामाजिकतेची जान असलेला अधिकारी माणूस
कालच्या निकालामुळे सामाजिक जबाबदारी वाढली असून खान्देशातील विशेषत: ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेविषयी जनजागृती अभियान राबणार असल्याचे त्यांनी सांगितले. ऑगस्ट महिन्यापर्यंत बर्यापैकी फावला वेळ असल्याने या काळात ग्रामीण भागात फिरणार असून खान्देशातील विद्यार्थ्यांचा युपीएसएसी परीक्षेमधील टक्का वाढविणाचा प्रयत्न करणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून गावाकडील मुलांना स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन करत आहे. त्यासाठी त्यांनी राहत्या घराजवळ खोली भाड्याने घेतली आहे. पीएसआय झाल्यांनतरही त्यांनी तळोद्यात विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन वर्गांचे आयोजन केले होते.
समाजासाठी प्रेरणास्थान
आदिवासी पावरा समाजातील ते युपीएसएसी पास होणारे पहिले व्यक्ती आहेत. प्राथमिक शिक्षक असलेल्या खर्डे यांनी दोनदा एमपीएसएसी व आता दुसर्यांदा युपीएससीत यश प्राप्त केले आहे. अजय खर्डे समाजासाठी प्रेरणास्थान असून त्यांच्यामुळेच आमच्या समाजातील मुले आता विविध परीक्षांमध्ये यशस्वी ठरत आहेत. दादांच्या प्रोत्साहनामुळेच आदिवसी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यीं विश्वासाने स्पर्धा परीक्षांना सामोरे जात आहेत. त्यांनी सुरू केलेली स्पर्धा परीक्षा चळवळ अशीच सुरू ठेवणार आहे.
-मंजीत चव्हाण, सपोनि जळगाव
Nice’s Inspied Sir