• Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us
Thursday, August 11, 2022
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational
No Result
View All Result
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result

आदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला

Tushar Bhambare by Tushar Bhambare
November 29, 2017
in Article
1
UPSC_ajay_kharde
WhatsappFacebookTelegram

आदिवासी पावरा समाज तसा तर शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला. अशा समाजातून छोट्याशा खेड्यातून येऊन एमपीएसीत घवघवीत यश प्राप्त करून चांगल्या पदावर पोहोचलेला माणूस. उत्तुंग ध्येयासक्तीने झपाटलेला हा माणूस एवढ्यावरच थांबला नाही. पोलीस दलात काम करत 35 व्या वर्षी यूपीएससीची तयारी केली आणि त्यातही उत्तुंग यश मिळविले. या ध्येयवेड्या अफाट माणसाचं नाव अजय खर्डे. स्वतःच्या यशाच्या आनंदात विरघळून न जाता आपल्या समाजातील अनेक मुलांनी अधिकारी व्हावे ही भावना ठेवून त्यांच्यासाठी मोफत अभ्यास वर्ग सुरु करणार्‍या अवलिया माणसाची ही कहाणी. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात जळगाव जिल्हा पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक असणारे अजय खर्डे यांनी 975 रँक मिळविली आहे.

अभ्यासासाठी टाळले सण-समारंभ

वैद्यकीय रजा व वेळोवेळी मिळणार्‍या सुट्यांचा सदुपयोग केला. गेल्या वर्षभरात समारभांत व गावाकडे जाणे टाळले. त्यामुळेच अभ्यासाला पुरेसा वेळ देवू शकलो. स्वत:च्या नोट्स व अभ्यास पद्धती विकसीत केली. मुक्त विद्यापीठातुन राज्यशास्त्रात पदवी घेतल्याने युपीएसएसी देखील राज्यशास्त्रात या विषयाची निवड केली. मराठी भाषा असली तरी हिंदी व इंग्रजी संदर्भ ग्रथांवर भर दिला.

सामाजिकतेची जान असलेला अधिकारी माणूस

कालच्या निकालामुळे सामाजिक जबाबदारी वाढली असून खान्देशातील विशेषत: ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेविषयी जनजागृती अभियान राबणार असल्याचे त्यांनी सांगितले. ऑगस्ट महिन्यापर्यंत बर्यापैकी फावला वेळ असल्याने या काळात ग्रामीण भागात फिरणार असून खान्देशातील विद्यार्थ्यांचा युपीएसएसी परीक्षेमधील टक्का वाढविणाचा प्रयत्न करणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून गावाकडील मुलांना स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन करत आहे. त्यासाठी त्यांनी राहत्या घराजवळ खोली भाड्याने घेतली आहे. पीएसआय झाल्यांनतरही त्यांनी तळोद्यात विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन वर्गांचे आयोजन केले होते.

ajay_kharde_study_room
अजय खर्डे चालवत असलेल्या स्टडी रूममध्ये अभ्यास करतांना आदिवासी विद्यार्थी

समाजासाठी प्रेरणास्थान

आदिवासी पावरा समाजातील ते युपीएसएसी पास होणारे पहिले व्यक्ती आहेत. प्राथमिक शिक्षक असलेल्या खर्डे यांनी दोनदा एमपीएसएसी व आता दुसर्‍यांदा युपीएससीत यश प्राप्त केले आहे. अजय खर्डे समाजासाठी प्रेरणास्थान असून त्यांच्यामुळेच आमच्या समाजातील मुले आता विविध परीक्षांमध्ये यशस्वी ठरत आहेत. दादांच्या प्रोत्साहनामुळेच आदिवसी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यीं विश्‍वासाने स्पर्धा परीक्षांना सामोरे जात आहेत. त्यांनी सुरू केलेली स्पर्धा परीक्षा चळवळ अशीच सुरू ठेवणार आहे.

-मंजीत चव्हाण, सपोनि जळगाव

Tags: Ajay KhardeDainik JanashaktiTushar BhambareUPSC
SendShare1074Share
Tushar Bhambare

Tushar Bhambare

Related Posts

maharashtra-police
Uncategorized

पोलिसाने कानाखाली मारल्यानंतर फळविक्रेता तरुण जिद्दीने बनला पोलीस उपनिरीक्षक

January 8, 2018
sagar_subhash_dhere_mpsc_sti
Article

अंधत्वावर मात करत सागर एमपीएससीच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत प्रथम

December 25, 2017
Pratamesh-hirve-isro
Article

मुंबईतील झोपडपट्टीत राहणारा तरुण बनला इस्त्रोत शास्त्रज्ञ

December 7, 2017

Comments 1

  1. Sameer Madavi says:
    4 years ago

    Nice’s Inspied Sir

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pandharpur

पंढरपूर नागरी सहकारी बँकेत 12 वी उत्तीर्णांना संधी.. असा करा अर्ज?

August 10, 2022
THDC

THDCIL Recruitment : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये 109 जागांसाठी भरती

August 10, 2022
Defense Ministry

संरक्षण मंत्रालयांतर्गत मुंबईत ‘या’ पदासाठी भरती, 75,000 रुपये पगार मिळेल

August 10, 2022
SAI Recruitment

SAI : भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये विविध पदांच्या 138 जागांसाठी भरती

August 10, 2022
Current Affairs 10 August 2022

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 10 ऑगस्ट 2022

August 10, 2022
job

केंद्र सरकारच्या ‘या’ कंपनीमध्ये 396 जागांसाठी भरती, पदवीधरांना मोठी संधी..

August 9, 2022
ADVERTISEMENT
  • Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group