⁠  ⁠

अमेरिकेच्या संरक्षणविषयक अर्थसंकल्पात भारताची संरक्षण क्षेत्रातील मदत वाढवली

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 1 Min Read
1 Min Read

अमेरिकेच्या संसदेने देशाच्या ४५.५० लाख कोटी रुपयांच्या (७०० अब्ज डॉलर) वार्षिक संरक्षणविषयक अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. २०१८ च्या संरक्षण अर्थसंकल्पात २०१७ च्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यात पाकिस्तानच्या संरक्षण मदतीवर कडक नियम लागू करण्यात आले आहेत तर भारताची संरक्षण क्षेत्रातील मदत वाढवण्यास परवानगी देण्यात आली आहे. नॅशनल डिफेन्स ऑथोरायझेशन अॅक्ट (एनडीएए) च्या प्रस्तावात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आशिया दौऱ्यानंतर अखेरच्या टप्प्यात अनेक बदल करण्यात आले. त्यानुसार भारत-अमेरिका यांच्यातील संरक्षण भागीदारीला आणखी बळकटी मिळणार आहे. अमेरिकेच्या अर्थसंकल्पात पाकिस्तानसाठी २ हजार २७७ कोटी रुपयांची तरतूद आहे. हा निधी दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाईसाठी वापरण्याची अट ठेवण्यात आली आहे.

Share This Article