आसाम रायफल्समध्ये विविध पदांसाठी भरती सुरु ; 10वी-12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी..

Published On: जून 21, 2025
Follow Us

Assam Rifles Recruitment 2025 : देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आली आहे. आसाम रायफल्सने विविध पदांसाठी भरती निघाली आहे. अर्ज प्रक्रिया २० जून २०२५ पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २१ जुलै २०२५ पर्यंत अर्ज भरू शकतात आणि सबमिट करू शकतात.
एकूण रिक्त जागा :
७९

रिक्त पदाचे नाव
रायफलमन/रायफलवुमन जनरल ड्युटी (पुरुष आणि महिला दोघांसाठी) ६९
वॉरंट ऑफिसर रेडिओ मेकॅनिक (पुरुष उमेदवारांसाठी फक्त) ०१
वॉरंट ऑफिसर ड्राफ्टमन (पुरुष उमेदवारांसाठी फक्त) ०१
हवलदार एक्स-रे असिस्टंट (पुरुष उमेदवारांसाठी फक्त) ०१
रायफलमन इलेक्ट्रिशियन मशिनिक व्हेईकल (पुरुष उमेदवारांसाठी फक्त) ०१
रायफलमन व्हेईकल मेकॅनिक फिटर (पुरुष उमेदवारांसाठी फक्त) ०१
रायफलमन प्लंबर (पुरुष उमेदवारांसाठी फक्त) ०१
रायफलमन सफाई (पुरुष उमेदवारांसाठी फक्त) ०४

भरतीसाठी पात्रता :
आसाम रायफल्सच्या या भरतीमध्ये १०वी आणि १२वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. याशिवाय, वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. रायफलमन/रायफलवुमन जनरल ड्यूटीसाठी फक्त १०वी उत्तीर्ण असणे पुरेसे आहे, तर ड्राफ्ट्समन पदासाठी आर्किटेक्चरल असिस्टंटशिपमध्ये डिप्लोमासह १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, एक्स-रे असिस्टंट, रेडिओ मेकॅनिक, व्हेईकल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि प्लंबर सारख्या पदांसाठी, संबंधित तांत्रिक डिप्लोमा किंवा आयटीआय प्रमाणपत्र मागितले आहे.

वय किती असावे
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि जास्तीत जास्त २५ वर्षे असावे. सरकारी नियमांनुसार राखीव श्रेणींना वयात सूट दिली जाईल. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आसाम रायफल्सच्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सरकारी वेतनश्रेणी आणि इतर भत्त्यांचा लाभ मिळेल.

अधिकृत संकेतस्थळ : https://www.assamrifles.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now