⁠  ⁠

MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये नवीन भरती, पदवीधरांना संधी.. वेतन १ लाखाहून अधिक

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

BMC Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई (The Municipal Corporation of Greater Mumbai) येथे काही जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ सप्टेंबर २०२२ आहे.  Brihanmumbai Municipal Corporation

एकूण जागा : ०५

पदाचे नाव : सहाय्यक जनसंपर्क अधिकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
०१) कला/विज्ञान/ वाणिज्य/ विधी/ अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी
०२) पत्रकारिता/जाहिरात/जन संपर्क व जनसंज्ञापन पदव्युत्तर पदवी

वयाची अट : ३८ वर्षांपर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : १२००/- रुपये [मागासवर्गीय – १०००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 

१) सहावा वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी (९३००-३४८००)+ श्रेणी वेतन रु ४४००/-
२) सातवा वेतन आयोगानुसारची सुधारित वेतनश्रेणी – एम२३-(४१८००-१३२३००)

निवडीचे निकष :

१) सहाय्यक जनसंपर्क अधिकारी संवर्गाची विहित अर्हता धारण करणारे उमेदवार लेखी परीक्षा देण्यासाठी पात्र असतील.
२) ऑनलाईन व लेखी परीक्षेतील एकत्रित उच्च गुणवत्तेनुसार निवड यादी तयार करण्यात येईल.
३) सदर निवड यादीनुसार मूळ कागदपत्रांची पडताळणी करुन रिक्त पदांएवढीच अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल.
४) ऑनलाईन व लेखी परीक्षेतील प्राप्त गुणांमध्ये समान गुण प्राप्त करणा-या उमेदवारांमध्ये जास्त अनुभव असणा-या उमेदवारास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
५) ऑनलाईन व लेखी परीक्षेत समान गुण प्राप्त करणारे व समान अनुभव असणा-या उमेदवारांमध्ये जन्म तारखेनुसार म्हणजे जेष्ठतेनुसार प्रथम प्राधान्यक्रम देण्यात येईल.
६) ऑनलाईन व लेखी परीक्षेत समान गुण, समान अनुभव व समान जन्म तारीख असल्यास अशा उमेदवारांना त्यांच्या आडनावाच्या आद्याक्षरानुसार प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
उमेदवाराची मूळ कागदपत्र पडताळणी करुन ती नियमानुसार यथायोग्य असल्यास नेमणूक करण्यात येईल. तथापि, नेमणूकीच्या कार्यवाही दरम्यान उमेदवार निवडीच्या विहीत अर्हता पुर्ण करीत नाही असे निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा नियुक्तीनंतर लक्षात आल्यास त्याची नेमणूक रद्द करुन निवड यादीतील पुढील उमेदवारांचा नियुक्तीकरिता विचार करण्यात येईल.

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ सप्टेंबर २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in

भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article