दोन्ही बहिणींनी केली कमाल ; शेतकऱ्याच्या लेकींना मिळाली सरकारी नोकरी!

Published On: ऑगस्ट 31, 2024
Follow Us

एकाच कुटुंबातील दोन्ही मुलींना सरकारी नोकरी मिळणं, हे त्या कुटुंबासाठी अभिमानास्पद बाब आहे. आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथील हे शेतकरी कुटूंब.प्रांजल संतोष जाधव आणि काजल संतोष जाधव या दोन्ही सख्या बहिणीची प्रशासकीय सेवेत निवड झाली आहे.या दोघींचे प्राथमिक शिक्षण जाधववाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. तर पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण रांजणी येथील नरसिंह विद्यालयात पूर्ण झाले आहे.

पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघींनी ठरवले की आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात करायची. प्रांजल हीची पोलीस कॉन्स्टेबलपदी निवड झाली आहे.यापरीक्षेत खुल्या गटातून १५० पैकी १२६ गुण मिळाले आहे. शेतकरी कुटुंबातील प्रांजल ही रांजणी येथील नरसिंह क्रीडा मंडळाची सदस्य असून अनेक वर्ष खो-खो खेळत आहे. तिने आतापर्यंत पाच राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा खेळून चार सुवर्ण पदके मिळवली आहेत. तसेच पुणे युनिव्हर्सिटी संघाकडून खेळतानाही तिने एक रौप्यपदक पटकावले आहे.‌

तर, तिची लहान बहीण काजलची देखील दोन महिन्यापूर्वी तलाठीपदी नियुक्ती झाली आहे.शेतकरी कुटुंबातील नुकतीच ठाणे शहर पोलिस कॉन्स्टेबलपदी मोठी पोलीस तर छोटी तलाठी दोघी सख्या बहिणी प्रशासकीय सेवेत गेल्याने सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025