Uncategorized
Curren Affair 22 November 2018
महाराष्ट्राला ९ राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार
- केंद्र सरकारच्या २0१८ सालच्या दिव्यांगजन पुरस्कारांत नागपूरची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे देशातील सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू ठरली आहे. नाशिकचा जलतरणपटू स्वयं पाटील यास देशातील सर्वोत्कृष्ट सृजनशील बालकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यातील ६ व्यक्ती आणि ३ संस्थांना हा पुरस्कार जाहीर झाला असून राष्ट्रपतींच्या हस्ते ३ डिसेंबर या जागतिक अपंगदिनी पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
- कांचनमाला पांडे हिने मेक्सिकोच्या पॅरा वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिप-२०१७ स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले होते. कांचनमालाने जवळपास
- १० हून अधिकवेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. अंधाच्या राष्ट्रीय जलतरण चॅम्पीयनशिप मध्ये तिने जवळपास १०० हून अधिक सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.
- डाऊन सिंड्रोम आजाराने ग्रस्त स्वयं पाटील च्या हृदयाला छिद्र झाले. नाशिकच्या जाजू माध्यमिक विद्या मंदिरात तो पाचवीत शिकतो. त्याने गेटवे आॅफ इंडिया ते सॅनक्रॉक हे ५ कि.मी.चे समुद्रातील अंतर एक तासात पूर्ण करून जलतरणात ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’ स्थापीत केला आहे.
- पुण्याचे दृष्टिबाधीत भूषण तोष्णीवाल यांना रोल मॉडेल तरआशिष पाटील यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांग कर्मचा-याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. आयआटी मुंबईचे प्राध्यापक रवी पुवैय्या यांना दिव्यांगांसाठी केलेल्या संशोधनासाठी तर दिव्यांगाच्या उत्थानाच्या कार्यासाठी बोरिवलीचे योगेश दुबे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
इंटरपोलच्या अध्यक्षपदी दक्षिण कोरियाचे किम यांग
- दक्षिण कोरियाचे किम जोंग यांग यांना इंटरपोलचे नवीन अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले असून त्यांच्याविरोधातील रशियन अधिकाऱ्याचा या पदासाठीच्या लढतीत किम यांनी पराभव केल्याने पाश्चिमात्य देशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. यांग हे आता मेंग होंगवेई यांची जागा घेणार असून २०२० पर्यंत अधिकारपदावर राहतील.
- किम यांना अमेरिकेचा पाठिंबा असून ते सध्या इंटरपोलचे हंगामी अध्यक्ष आहेत. दुबई येथे इंटरपोलच्या सदस्य देशांची बैठक झाली त्यात आधीचे मूळ चीनचे असलेले अध्यक्ष मेंग होंगवेई सप्टेंबरमध्ये बेपत्ता झाल्याच्या घटनेनंतर रिकाम्या झालेल्या अध्यक्षपदी यांग यांची निवड करण्यात आली.
मंगळावर रोव्हर गाडी उतरवण्यासाठी जेझिरो विवराची निवड
- नासाने २०२० मध्ये मंगळावर रोव्हर गाडी उतरवण्याचे ठरवले असून त्यासाठी ३.६ अब्ज वर्षांपूर्वीच्या जुन्या विवराची जागा निश्चित करण्यात आली आहे. सोमवारी याबाबतची घोषण करण्यात आली असून जेथे ही रोव्हर गाडी उतरवली जाणार आहे, त्या विवराचे नाव जेझिरो असे आहे. पाच वर्षे शोध घेतल्यानंतर मंगळावरील साठ ठिकाणांतून या विवराची निवड रोव्हर गाडी उतरवण्यासाठी करण्यात आली.
- जुलै २०२० मध्ये ही रोव्हर गाडी मंगळावर पाठवली जाणार असून त्यासाठी ठिकाण निवडण्यासाठी मंगळ मोहिमेतील चमूने चर्चा केली. मंगळावर पूर्वी असलेल्या जीवसृष्टीचे पुरावे गोळा करणे हा या मोहिमेचा उद्देश असून तेथे सूक्ष्मजीवांचे अस्तित्व शोधण्यासाठी मातीचे नमुने गोळा करण्यात येणार आहेत.
- जेझिरो विवर
जेझिरो विवर हे ४५ किलोमीटरचे असून तेथून जुने सेंद्रिय रेणू मिळू शकतात. एके काळी येथे नदी होती. तेथे पाण्याचे पूर्वी अस्तित्व असल्याने सूक्ष्मजीव असू शकतात. याशिवाय तेथे पाच प्रकारचे खडक असून माती व काबरेनेटचा साठा आहे.
राज्यपाल मलिक यांच्याकडून जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त
- जम्मू-काश्मीर विधानसभेतील सर्वांत मोठा पक्ष पीडीपीने नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने नवे सरकार बनवण्याचा दावा सादर केला. त्यानंतर राज्यपालांनी विधानसभा बरखास्त केली.
- दरम्यान, पीडीपीनंतर दोन आमदार असलेल्या पीपल्स कॉन्फरन्सनेही भाजपा आणि इतर पक्षांच्या १८ आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर सरकार बनवण्याचा दावा सादर केला होता. त्यानंतर राजभवनातून शासकीय अधिसूचनेत विधानसभा भंग करण्याची घोषणा करण्यात आली.
भांडवली पर्याप्तता मर्यादेत शिथिलतेने बँकांच्या
कर्जक्षमतेत ३.५ लाख कोटींनी वाढ
- रिझव्र्ह बँकेने देशातील वाणिज्य बँकांसाठी भांडवलविषयक नियमांत शिथिलतेसह, भांडवली संरक्षण पातळी (सीसीबी) राखण्याच्या मुदतीतही वाढ केल्याने, बँकांच्या कर्ज वितरण क्षमतेत आणखी ३.५ लाख कोटी रुपयांची भर पडेल, असा तज्ज्ञांचा कयास आहे.
- क्रिसिलने २०१८-१९ साठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी १.२० लाख कोटी रुपयांच्या अतिरिक्त भांडवलाची गरज असल्याचे यापूर्वी सांगितले होते, तेही बदलून आता केवळ ८५,००० कोटी रुपयांचे भांडवल आवश्यक असल्याचे म्हटले आहे. एप्रिल २०१७ पासून बँकांमध्ये नव्याने १.१२ लाख कोटी रुपयांचे भांडवल गुंतले गेले आहे.
- बॅसल-३ नियमावलीप्रमाणे हे प्रमाण आठ टक्क्यांवर आणावे, असा सरकारकडून आग्रह होता. मात्र सीसीबी मर्यादेसाठी मुदतवाढीने, आयएल अॅण्ड एफएस संकटाच्या पाश्र्वभूमीवर निर्माण झालेली रोकड तरलतेच्या समस्येचे बऱ्यापैकी निराकरण होईल, असा क्रिसिलचा विश्वास आहे.
- सूक्ष्म आणि लघू उद्योगांना बँका आणि अन्य वित्तसंस्थांकडून कर्जपुरवठा वाढेल, यासाठी केंद्र सरकार आणि सिडबी यांनी एकत्रितपणे ‘द क्रेडिट गॅरन्टी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अॅण्ड स्मॉल एंटरप्राइजेस (सीजीटीएमएसई)’ या संस्थेची स्थापना केली आहे.
- या नवीन प्रक्रियेची १ डिसेंबरपासून अंमलबजावणी सुरू होईल.