⁠  ⁠

Current Affair 07 December 2018

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

कृषी निर्यात धोरणास मंजुरी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळाने 6 डिसेंबर रोजी कृषी निर्यात धोरणाला मंजूरी दिली. यामुळे आता 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारने दिलेले वचन पूर्ण होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.
  • मंत्रीमंडळाची बैठक पार पडल्यानंतर केंद्रीय वाणिज्य आणि व्यवसाय मंत्री सुरेश प्रभू यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. कृषी निर्यात धोरणाला मंजूरी देण्यात आली. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे दिलेले वचन पूर्ण होणार आहे.
  • स्थिर व्यापाराच्या शासन धोरणामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाच्या निर्यातीची संधी मिळणार असून त्याचा चांगला फायदाही होणार आहे. या धोरणामुळे सेंद्रीय आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थ्यांच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्यात येणार आहेत. तसेच या धोरणामुळे विविध शेतमालाची निर्यात करणेही शक्य होणार आहे.

राज्यात साजरा होणार मराठी भाषा संवर्धन पंधरवडा:

  • मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी राज्याच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने 1 ते 15 जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.
  • तर या पंधरवड्यादरम्यान मराठी भाषेचा राजभाषा म्हणून सार्वत्रिक वापर करण्याच्या दृष्टीने सर्व कार्यालय प्रमुखांनी भाषा पंधरवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
  • त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्राच्या अखत्यारीतील कार्यालये, मंडळे, सार्वजनिक उपक्रम यांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे. तो होतो की नाही, याचा पंधरवड्यात सर्व कार्यालय प्रमुखांनी आढावा घेण्याचे आदेश शासन निर्णयात देण्यात आले.

भविष्यात जगात वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये सूरत नंबर १

  • भविष्यात जगातील वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये भारताचे वर्चस्व असेल. ग्लोबल इकोनॉमिक रिसर्चच्या अहवालामधून ही माहिती समोर आली आहे. भविष्यातील जीडीपी दराची तुलना केल्यास चित्र वेगळे असेल. २०१९ ते २०३५ दरम्यान जगातील वेगाने वाढणाऱ्या २० शहरांपैकी १७ शहरे एकटया भारतातील असतील असे या अहवालात म्हटले आहे.
  • बंगळुरु, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांची कामगिरी उत्तम असेल असे ऑक्सफर्ड इकोनॉमिक्सने आपल्या अहवालात म्हटले आहे.
  • २०१९ ते २०३५ दरम्यान जगातील वेगाने वाढणाऱ्या १० शहरांमध्ये सूरत पहिल्या स्थानावर असेल. त्याखालोखाल आग्रा, बंगळुरु, हैदराबाद या शहरांचा क्रमांक असेल. नागपूर, तिरुपूर, राजकोट, तिरुचिरापल्ली, चेन्नई आणि विजयवाडा ही शहरे सुद्धा टॉप टेनमध्ये आहेत.

अमिरातीतील श्रीमंत भारतीयांमध्ये डॉ. दातार यांना १८ वे मानांकन

  • अल अदील ट्रेडिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांना अरेबियन बिझनेसतर्फे संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) सर्वांत श्रीमंत भारतीयांच्या यादीत वर्ष २०१८ साठी १८ वे मानांकन देऊन नुकतेच गौरवण्यात आले.
  • या यादीत समावेश असलेले डॉ. दातार हे एकमेव महाराष्ट्रीय उद्योजक आहेत. गेल्या दोन वर्षांत त्यांनी ३९ व्या क्रमांकापासून १८ व्या क्रमांकापर्यंत येण्याची कामगिरी केली आहे.
Share This Article