⁠  ⁠

Current Affair 14 November 2018

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

‘बाल दिना’चा इतिहास

  • स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्‍मदिवस ‘बाल दिन’ म्हणून भारतात साजरा केला जातो. केवळ भारतातमध्ये बालदिन १४ नोव्हेंबरला साजरा केला जातो.
  • जगभरात १९२५ पासून ‘बाल दिन’साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने २० नोव्हेंबर १९५४ ला बाल दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. आजही विविध देशांमध्ये ‘बाल दिन’च्या तारखांबाबत भिन्नता आढळते. भारतात मात्र १९६४ नंतर १४ नोव्हेंबरला ‘बाल दिन’ साजरा केला जाऊ लागला.
  • भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू लहान मुलांमध्ये रमायचे आणि त्यांच्या लाघवी स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे. २७ मे १९६४ ला पंडितजींचे निधन झाले. चिमुरड्यांच्या लाडक्या ‘चाचा’ नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी अर्थात १४ नोव्हेंबरला भारतात ‘बाल दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

श्रीलंका : SCने रद्दबातल ठरवला राष्ट्रपतींचा निर्णय

  • श्रीलंकेची संसद बरखास्त करण्याच्या राष्ट्रपतींचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे.
  • शिवाय राष्ट्रपती मैत्रीपाला श्रीसेना यांनी सुरू केलेल्या मध्यावधी निवडणुकीच्या तयारीलाही खो दिला आहे. पदच्युत पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टी श्रीसेना यांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर न्यायालयाने निर्णय दिला आहे.
  • श्रीसेना यांनी २६ ऑक्टोबरला पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना पदावरून हटवलं होतं आणि त्यांच्या जागी माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षेंची नियुक्ती केली होती.
  • श्रीसेना यांनी संसद बरखास्त करत निवडणुकांची घोषणा केली होती. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने आता स्थगिती दिल्यानंतर श्रीलंकेवरील राजकीय संकट अधिक गहिरे झाले आहे.

अंगणवाडी सेविकांच्या सेवा समाप्तीचे वय ६५ वर्षे

  • राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
  • अंगणवाडी केंद्रात काम करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. सुमारे दोन लाख कर्मचारी अंगणवाडी सेवेत कार्यरत आहेत.
  • याबाबतचा शासननिर्णय २३ फेब्रुवारी २०१८ रोजी काढण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या सेवा समाप्तीचे वय ६५ वर्षे ठेवण्याबाबत विधानमंडळाच्या मार्च-२०१८ च्या अधिवेशनात सदस्यांनी मागणी केली होती.

ICC ODI Ranking : कोहली-जसप्रीत बुमराहचं अव्वल स्थान कायम

  • भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिका संपल्यानंतर आयसीसीने वन-डे क्रिकेटची सुधारीत क्रमवारी जाहीर केली आहे.
  • न्यूझीलंडच्या रॉस टेलर, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि पाकिस्तानच्या फखार झमानच्या क्रमवारीतही सुधारणा झालेली आहे.

आयसीसीच्या वन-डे क्रमवारीतले सर्वोत्तम 10 फलंदाज –
1) विराट कोहली
2) रोहित शर्मा
3) रॉस टेलर
4) जो रुट
5) बाबर आझम
6) डेव्हिड वॉर्नर
7) फाफ डु प्लेसिस
8) शिखर धवन
9) केन विल्यमसन
10) क्विंटन डी-कॉक

आयसीसीच्या वन-डे क्रमवारीतले सर्वोत्तम 10 गोलंदाज –
1) जसप्रीत बुमराह
2) राशिद खान
3) कुलदीप यादव
4) कगिसो रबाडा
5) युझवेंद्र चहल
6) आदिल रशिद
7) ट्रेंट बोल्ट
8) मुजीब उर रेहमान
9) जोश हेजलवूड
10) मुस्तफिजूर रेहमान

Share This Article