देशातील ‘नारी शक्ति’ला नवी ओळख
- भारतामधील नारी शक्ती या शब्दाला आता जागतिक स्तरावर स्थान मिळाले आहे. महिलांच्या सशक्तिकरणासाठी ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2018 मधील ‘वर्ड ऑफ द ईयर‘ म्हणून ‘नारी शक्ती‘ या शब्दाची निवड केली आहे.
- तर महिला सशक्तीकरणासाठी सरकारने केलेले प्रयत्न आणि मीटू आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या शब्दाचा डिक्शनरीत समावेश करण्यात आल्याचे ऑक्सफर्डकडून सांगण्यात आले. Nari Shakti
- जयपूर येथे आयोजित साहित्य महोत्सवात याबाबत घोषणा करण्यात आली आहे. तज्ञांनी नारी शक्ती या शब्दाच्या निवडीवर चर्चा केली. बऱ्याच मंथनानंतर ‘नारी शक्ती‘ या शब्दाचा ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश करण्यात आला आहे. या आधी ऑक्सफर्डने 2017 मध्ये ‘आधार‘ या शब्दाचा डिक्शनरीत समावेश केला होता.
- महिलांचे अधिकार आणि प्रत्येक क्षेत्रातील त्यांच्या प्रतिनिधीत्वासंदर्भात ‘नारी शक्ती‘ या हिंदी शब्दाचा उपयोग केला जातो. स्वत:च्या मनाप्रमाणे जगणाऱ्या महिलांसाठी नारी शक्ती हा शब्द वापरला जातो, असे मत ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या आहे.
‘ट्रेन १८’ झाली ‘वंदे भारत एक्स्प्रेस’
- पूर्णपणे भारतीय बनावटीच्या व पहिल्या इंजिनविरहित ‘ट्रेन १८’चे नाव ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ असे करण्यात आल्याचे, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी जाहीर केले. या रेल्वेला सर्व प्रकारच्या मंजुरी मिळाल्यानंतर ही मध्यम जलदगतीची ‘ट्रेन १८’ प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.
- चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीत १८ महिन्यांच्या परिश्रमांनंतर ही १६ डब्यांची रेल्वेगाडी तयार करण्यात आली असून, त्यासाठी ९७ कोटी रुपये इतका खर्च आला आहे. देशातील ही पहिली इंजिनविरहित रेल्वे आहे. रेल्वेचा कमाल वेग ताशी १६० किलोमीटर इतका असणार आहे. पूर्णपणे वातानुकूलित असलेली ही रेल्वे पहिल्यांदा दिल्ली-वाराणसी मार्गावर धावणार असून, कानपूर आणि प्रयागराज येथे रेल्वेचा थांबा असणार आहे.
- ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत जागतिक दर्जाची रेल्वे बनवली जाऊ शकते, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. ही पूर्णपणे भारतीय बनावटीची रेल्वे असून, त्यासाठी सामान्य भारतीयांनी अनेक नावे सुचवली आहेत. मात्र, आम्ही त्याचे नाव ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रसिद्ध लेखिका गीता मेहता यांचा ‘पद्मश्री’ स्वीकारण्यास नकार
- ख्यातनाम लेखिका आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बहीण गीता मेहता यांनी पद्मश्री पुरस्कार नाकारला आहे. भारत सरकारने मला हा सन्मान दिला, यासाठी मी त्यांची आभारी आहे. पण निवडणुकीच्या तोंडावर मला हा सन्मान देण्यात आल्याने याचे गैरअर्थ निघू शकतात. त्यामुळे मी हा किताब स्वीकारणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
- जासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले. लेखिका गीता मेहता यांना देखील पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आले. गीता मेहता ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बहीण आहेत.
- गीता मेहता यांनी कर्म कोला (१९७९), राज (१९८९), अ रिव्हर सूत्र (१९९३), इटर्नल गणेशा- फ्रॉम बर्थ टू रिबर्थ अशा अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांनी १४ हून अधिक माहितीपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे.
सायनाला विजेतेपद
- भारताची बॅडमिंटनक्वीन सायना नेहवाल ही इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत विजेती ठरली. बीडब्लूएफ स्पर्धेतील गेल्या दोन वर्षांतील तिचे हे पहिलेच जेतेपद ठरले. स्पेनची जगज्जेती कॅरोलिना मरीनने गुडघा दुखावल्याने लढत पहिल्या गेममधील १०-४ अशा आघाडीनंतर सोडून दिली आणि सायनाचे जेतेपद निश्चित झाले.
- या लढतीत मरीनने जोरदार सुरुवात केली होती. तिने ९-२ आघाडी घेतली होती.
- लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मिळविणाऱ्या सायनाचे हे बीडब्लूएफ स्पर्धेतील दोन वर्षांतील पहिलेच जेतेपद ठरले. २०१७मध्ये तिने मलेशियात स्पर्धा जिंकली होती.
Australian Open : जापानची नाओमी ओसाका विजयी
- जपानच्या नाओमी ओसाकाने ‘ऑस्ट्रेलियन ओपन’ टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. महिला एकेरीच्या अंतिम लढतीत नाओमीने चेक रिपब्लिकच्या पेट्रा क्वितोवावर ७-६, ५-७, ६-४ अशी मात केली. ओसाकाचे हे कारकीर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.
- ‘ऑस्ट्रेलियन ओपन’ टेनिस स्पर्धेतील या जेतेपदासह सोमवारी जाहीर होणाऱ्या डब्ल्यूटीए क्रमवारीमध्ये नाओमी ओसाकाने अव्वल स्थान पटकावले आहे. ‘यूएस ओपन’ आणि त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब जिंकून ओसाकाने आता सेरेना विलियम्सची बरोबरी केली आहे. सेरेना विलियम्सने २०१५ साली सलग या दोन स्पर्धांचे जेतेपद पटकावत विक्रम केला होता.