---Advertisement---

चालू घडामोडी : ०१ डिसेंबर २०२०

By Chetan Patil

Updated On:

Current Affairs 01 December 2020
---Advertisement---

Current Affairs : 01 December 2020

‘ब्रह्मपुत्रा’वर चीन बांधणार महाकाय धरण

brahmaputra map

चीनने लवकरच तिबेटमधून उगम पावणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवर म्हणजेच यारलुंग जांगबो नदीवर भारतीय सिमेजवळ मोठं धरण बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
हे धरण जगातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असणार आहे.
सध्या जगातील सर्वात मोठं धरण असणाऱ्या थ्री जॉर्जच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या विजेच्या तीनपट अधिक जलविद्युत निर्मिती या धरणाचा माध्यमातून होणार आहे.
या प्रकल्पामुळे ईशान्य भारतातील राज्यांबरोबरच बांगलादेशमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण करण्याचे समार्थ्य चीनला मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे धरण तिबेटमधील मेडोग काउंटीमध्ये उभारण्यात येणार आहे. हा प्रदेश भारताच्या अरुणाचल प्रदेशपासूनच खूपच जवळ आहे.
जगातील सर्वाधिक जलविद्युत निर्मिती करणाऱ्या धरणांमध्ये या धरणाचा समावेश असेल. तिबेटमधून उगम पावणारी ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेश राज्याच्या सीमेतून भारतामध्ये प्रवेश करते.
अरुणाचल प्रदेशमध्ये या नदीला सियांग या नावाने ओळखलं जातं.
अरुणाचलमधून ही नदी आसाममध्ये प्रवेश करते जिथून तिला ब्रह्मपुत्रा या नावानं ओळखलं जातं. आसाममधून ही नदी बांगलादेशच्या हद्दीत प्रवेश करते. ब्रह्मपुत्रा नदी ही ईशान्य भारतातील राज्यांबरोबर बांगलादेशमधील प्रमुख नदी आहे. लाखो लोकांची उपजिविका या नदीवर अवलंबून आहे.
चीन याच वर्षापासून या महत्वकांशी प्रकल्पाचे काम हाती गेणार आहे. पुढील वर्षी लागू होणाऱ्या चीनच्या १४ व्या पंचवार्षीक योजनेत या प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आली आहे.

मध्य प्रदेश सरकार आणणार ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा

उत्तर प्रदेशनंतर आता मध्य प्रदेश सरकारही जबरदस्तीनं धर्मांतरविरोधी (लव्ह जिहाद) कायदा आणणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याची घोषणा केली.
तसेच उत्तर प्रदेशमध्ये नुकताच हा अध्यादेश लागू झाला असून त्याअंतर्गत एक अटकही झाली आहे.
उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने लग्नाच्या आमिषानं होणारं धर्मांतर रोखण्यासाठी अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाला दोनच दिवसांपूर्वी राज्यपाल अनंदीबेन पटेल यांनी मान्यता दिली. त्यांच्या मान्यतेनंतर हा अध्यादेश राज्यात लागू झाला.

mpsc telegram channel

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

1 thought on “चालू घडामोडी : ०१ डिसेंबर २०२०”

Comments are closed.