⁠  ⁠

चालू घडामोडी : ०१ फेब्रुवारी २०२१

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Current Affairs : 01 February 2021

म्यानमारमध्ये सत्तापालट; आंग सान सू की यांच्यासह राष्ट्राध्यक्षांना अटक

Myanmar - Wikipedia

म्यानमारमध्ये लष्करानं सत्तापालट घडवून आणला असून सत्ता आपल्या हातात घेतली आहे.
म्यानमारच्या लोकशाहीवादी सर्वोच्च नेत्या आंग सान सू की यांच्यासह देशाचे राष्ट्रपती विन म्यिंट आणि सत्तारुढ पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांना लष्कराकडून अटक करण्यात आली आहे.
सत्ता ताब्यात घेतल्यानंतर लष्कराने देशात एका वर्षासाठी आणीबाणी जाहीर केली आहे. त्यामुळे लष्कराचे कमांडर इन चीफ मिन आंग ह्लाईंग यांच्या हाती सत्तेची सुत्रे आली आहेत.
म्यानमारच्या राजकारणातील महत्वाच्या नेत्या असलेल्या आंग सान सू की या ७५ वर्षीय महिला नेत्या २०१५ मध्ये राष्ट्रीय निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवत सत्तेत आल्या होत्या.
म्यानमारमध्ये १९६२ मध्ये लष्कराने सत्ता हाती घेतली होती. त्यानंतर ४९ वर्ष लष्कराचे नियंत्रण होते.

जानेवारीत विक्रमी १.२० लाख कोटी ‘जीएसटी’ संकलन

gst

जानेवारी महिन्यात वस्तू व सेवा करातून विक्रमी १.२० लाख कोटींचा महसूल मिळाला.
जानेवारीतील हे ‘जीएसटी’ संकलन गेल्या वर्षीच्या (२०२०) जानेवारीच्या महसूलापेक्षा आठ टक्क्यांनी अधिक आहे.
जुलै २०१७ मध्ये ‘जीएसटी’ लागू झाल्यापासूनचे हे सर्वाधिक करसंकलन असल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
सलग चौथ्या महिन्यात ‘जीएसटी’ संकलन एक लाख कोटींहून अधिक झाले आहे. डिसेंबर २०२० मध्ये ‘जीसटी’ संकलन १,१५,१७४ कोटी इतके होते.

अॅथलेटिक्स : डायनाला सुवर्ण

Image

इंग्लंडची डायना एशर स्मिथने जागतिक इनडोअर अॅथलेटिक्स स्पर्धेत ६० मीटरमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्यांनी ७.०८ सेकंदांचा वेळ घेतला. ही तिची वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी ठरली.
ती एशा फिलिपचा ब्रिटिश विक्रम मोडण्यापासून ०.०२ सेकंद चुकली. स्मिथने तीन वर्षांनी इनडोअर स्पर्धेत सहभाग घेतला होता.
दुसरीकडे, ८०० मीटरच्या पुरुष गटात इलियट जाइल्स ४५.५० सेकंदांसह पहिल्या स्थानी राहिला.
फ्रान्सच्या बेंजामिन रॉबर्टने रौप्यपदक आणि पिएरे एंब्रोइसे बोसेने कांस्यपदक जिंकले.

Share This Article