Current Affairs 01 July 2020
भारत पुन्हा खरेदी करणार बंकर फोडणारे स्पाइस-२००० बॉम्ब
- भारताची स्पाइस २००० बॉम्ब खरेदी करण्याची योजना आहे. स्पाइस बॉम्बमध्ये जमिनीवरील टार्गेटसचा अत्यंत अचूकतेने वेध घेण्याची क्षमता आहे.
- या बॉम्बच्या खरेदीमुळे भारताच्या ताकतीमध्ये आणखी वाढ होईल. मागच्यावर्षी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक करण्यात आला होता. हा तळ स्पाइस २००० बॉम्बने नष्ट करण्यात आला होता.
- एअर फोर्ससाठी हे बॉम्ब खरेदी करण्यात येणार आहेत. चीन बरोबर वाद सुरु असताना सैन्यदलांना तात्काळ खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. एअरफोर्सकडे स्पाइस २००० बॉम्ब आहेत. पण आता आणखी असे बॉम्ब खरेदी करण्याचा विचार आहे.
- भारताकडे उपलब्ध असलेल्या स्पाइस बॉम्बच्या नव्या आवृत्तीमध्ये ७० किमीच्या परिघातील लक्ष्याचा अचूक वेध घेण्याबरोबर बंकर उद्धवस्त करण्याची क्षमता आहे.
- काय आहे स्पाइस २००० बॉम्ब
- भारताने बालाकोटमध्ये शत्रूच्या तळावर हल्ला करण्यासाठी स्पाइस २००० अस्त्राचा वापर केला. स्पाइस २००० हा स्मार्ट बॉम्ब असून अत्यंत अचूकतेने लक्ष्याचा वेध घेण्यासाठी या बॉम्बचा वापर केला जातो.
- स्पाइस २००० ला बॉम्ब म्हटले जात असले तरी हा एक ‘गायडन्स किट’ आहे. म्हणजे ज्याला मार्गदर्शक म्हणता येईल. पारंपरिक वॉरहेड किंवा बॉम्ब जो असतो त्याला स्पाइस २००० किट जोडले जाते. त्यामुळे २६ फेब्रुवारीला एअर स्ट्राइकच्यावेळी जो बॉम्ब वापरला गेला तो स्वदेशी बनावटीचा असावा. त्याची निर्मिती भारतातील दारुगोळा कारखान्यामध्ये झाली असावी.
- या स्पाइस किटची निर्मिती इस्त्रायलमधल्या कंपनीने केली आहे.
- या किटमध्ये कॅमेरा, मेमरी चीप आणि जीपीएस असते. ज्याच्या मदतीने लक्ष्यावर अचूक प्रहार करता येतो. एकदा लक्ष्य निश्चित झाले की, या स्मार्ट किटच्या मेमरी चीपमध्ये सर्व माहिती सेट केली जाते. टार्गेटचे जीपीएस लोकेशन, उपग्रहामार्फत घेतलेले फोटो, लक्ष्याच्या आसपास काय आहे त्याची माहिती मेमरी चीपमध्ये सेट केली जाते. पारंपारिक बॉम्बला हे स्मार्ट किट जोडले जाते.
हाँगकाँगसाठी बनवण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर झाला
चिनी संसदेमध्ये मंगळवारी खास हाँगकाँगसाठी बनवण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर झाला. त्यामुळे संपूर्ण हाँगकाँगवर कब्जा करण्याचा चीनचा मार्ग मोकळा झाला आहे.
कधीकाळी ब्रिटिशांची वसाहत असलेले हाँगकाँग 23 वर्षांपूर्वी चीनकडे सोपवण्यात आले.
चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीमध्ये एकमताने हा राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर करण्यात आला. सुत्रांच्या हवाल्याने रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.
हाँगकाँग हे जगातील महत्वाचे वित्तीय केंद्र आहे. हाँगकाँग 1997 पासून चीनच्या नियंत्रणाखाली आहे.
जाडेजाला Most valuable player म्हणून घोषित- Wisden
- भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
- Wisden ने जाडेजाला 21व्या शतकातला भारताचा Most valuable player म्हणून घोषित केलं आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही प्रकारांत जाडेजा सर्वोत्तम कामगिरी करत असल्यामुळे त्याची या बहुमानासाठी निवड झालेली आहे.
- तिन्ही क्षेत्रात जाडेजाच्या कामगिरीचा अभ्यास केला