⁠  ⁠

चालू घडामोडी : ०१ नोव्हेंबर २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Current Affairs : 01 November 2020

अहमदाबादहून एकता पुतळ्यापर्यंत सागरी विमानसेवा सुरू

vdh02

गुजरातमधील नर्मदा जिल्ह्य़ातील एकता पुतळा (स्टॅच्यू ऑफ युनिटी) ते अहमदाबादमधील साबरमती किनारा यादरम्यानच्या सागरी विमान (सी-प्लेन) सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
सरदार सरोवर धरणाजवळच्या तळे क्रमांक ३ येथे या सेवेचे उद्घाटन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्ताने करण्यात आले.
सीप्लेन सेवेमुळे पर्यटक अहमदाबादहून केवडिया २०० कि.मीचे हे अंतर ४० मिनिटात कापले.
पाच तासांचा हा रस्ता प्रवास हवाई मार्गे कमी काळात होईल.
नदीच्या भागात तरंगते एरोड्रोम उभारण्यात आले आहेत.
सरदार सरोवरानजीकच्या तळे क्रमांक तीन येथून प्रवासी या विमानात बसून यापुढे जाऊ शकतील.

ओबीसींसाठी सैनिक शाळांमध्ये २७ टक्के आरक्षण जाहीर

देशभरातील सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे.
पुढील शैक्षणिक सत्रापासून (२०२१-२२) हे आरक्षण लागू होणार आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी सैनिक स्कूल सोसायटी देशभरातील ३३ निवासी शाळांचं कारभार पाहतं.
या निर्णयामुळे सैनिक शाळांमध्ये आता अनुसूचित जाती १५ टक्के, अनुसूचित जमाती सात टक्के, ओबीसी २७ टक्के, संरक्षण विभाग १३ टक्के आणि खुल्या प्रवर्गासाठी ३८ टक्के अशी विभागणी असणार आहे.
परिपत्रकातील माहितीनुसार, सैनिक शाळा ज्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात असते तेथील मुलांसाठी ६७ टक्के जागा राखीव असतात. उर्वरित ३३ टक्के जागा इतर राज्यांमधील मुलांसाठी असतात. A आणि B अशा पद्दतीनं या यादीची क्रमवारी केली जाते. आरक्षणाचा निर्णय दोन्ही याद्यांमध्ये लागू असणार आहे.

अ‍ॅलेक्सिस व्हॅस्टिने बॉक्सिंग स्पर्धा : भारताला तीन सुवर्णपदके

spt02 5

करोनाच्या साथीतून जग सावरत असताना नँटिस (फ्रान्स) येथे झालेल्या अ‍ॅलेक्सिस व्हॅस्टिने बॉक्सिंग स्पर्धेत जागतिक रौप्यपदकविजेता अमित पंघाल (५२ किलो), आशीष कु मार (७५ किलो) आणि संजीत (९१ किलो) यांनी सुवर्णपदकांची कमाई केली.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या आणि राष्ट्रकुल रौप्यपदक विजेत्या अमितने अमेरिकेच्या रेने अब्राहमला ३-० अशी धूळ चारली.
भारतीय खुल्या बॉक्सिंग स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या संजीतने फ्रोन्सच्या सोहेब बौफियाचे आव्हान मोडीत काढले.
आशियाई रौप्यपदक विजेत्या आशीषला अमेरिके चा प्रतिस्पर्धी जोसेफ ग्रेरामी हिक्सने दुखापतीमुळे माघार घेतल्याने विजेता ठरवण्यात आले. तथापि, आशियाई रौप्यपदक विजेत्या कविंदर सिंग बिश्तला ५७ किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. फ्रान्सच्या सॅम्युएल किस्टॉहरीने त्याला २-१ असे पराभूत केले.
उपांत्य फे रीत पराभूत झालेल्या शिवा थापा (६३ किलो), सुमित सांगवान (८१ किलो) आणि सतीश कु मार (+९१ किलो) या भारताच्या तिघांना कांस्यपदके मिळाली.

Share This Article