चालू घडामोडी : ०२ डिसेंबर २०२०
Current Affairs : 02 December 2020
चीनचे यान यशस्वीरित्या चंद्रावर!
चीनचे यंत्रमानव म्हणजे रोबोटयुक्त चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर अपेक्षित ठिकाणी मंगळवारी उतरले .
चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करुन ते पृथ्वीवर आणण्यासाठी चीनचे मानवरहित यान गेल्या मंगळवारी चंद्राकडे रवाना झाले होते.
हे यान लाँग मार्च ५ या प्रक्षेपकाच्या मदतीने सोडण्यात आले होते.
चँग इ ५ ही अतिशय गुंतागुंतीची चांद्र मोहीम असून त्यात अवकाश इतिहासावर भर देण्यात आला आहे.
अमेरिकेने चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करण्यासाठी अवकाशवीर पाठवले होते.
रशियाने खडकांचे नमुने आणण्यासाठी मानवरहित मोहिमा राबवल्या होत्या. ही अवकाशयाने चंद्रावर जाऊन परत आली होती.
चीनची मोहीम गुंतागुंतीची आहे कारण त्यात हे यान चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित केल्यानंतर त्याचे लँडर व अॅसेंडर हे भाग चंद्रावर उतरले असून तेथील खडकांचे जास्तीत जास्त नमुने गोळा करणार आहे.
ब्राह्मोसची नौदलासाठी यशस्वी चाचणी
ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या नौदलासाठीच्या आवृत्तीची चाचणी बंगालच्या उपसागरात मंगळवारी यशस्वी झाली आहे.
लष्कराच्या तीनही सेनादलांसाठी या क्षेपणास्त्राच्या चाचण्या सुरू आहेत.
सहा आठवडय़ांपूर्वी अशीच चाचणी नौदलासाठी अरबी समुद्रात घेण्यात आली होती. ब्राह्मोस एरोस्पेस या भारत-रशिया यांच्या संयुक्त प्रकल्पात हे स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.
२४ नोव्हेंबरला त्याची जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी चाचणी २.८ मॅक वेगाने (ध्वनीच्या तीन पट वेगाने) यशस्वी झाली होती.
ले. जन. राजीव चौधरीबीआरओचे महासंचालक
लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी सीमा मार्ग संस्थेचे (बीआरओ) नवे महासंचालक असतील.
ते डिसेंबर १९८३ मध्ये काॅर्प आॅफ इंजिनिअर्समध्ये दाखल झाले होते. चौधरी बीआरओचे २७ वे महासंचालक असतील. देशाच्या सीमेवर सुरक्षेसाठी रस्ते चांगले ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.