⁠  ⁠

चालू घडामोडी : ०२ फेब्रुवारी २०२१

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Current Affairs : 02 February 2021

‘नासा’च्या कार्यकारी प्रमुख पदावर भाव्या लाल

Bhavya Lal

भारतीय वंशाच्या भाव्या लाल यांना अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आलं आहे.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भाव्या यांचं नाव नासाच्या परिक्षम मसितीच्या सदस्य म्हणून निवडलं आहे.
भाव्या यांना अभियांत्रिकी आणि अवकाश संशोधन या दोन्ही क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा दांडगा अनुभव आहे.
यापूर्वी भाव्या नाच्या इनोव्हेटिव्ह अ‍ॅडव्हान्स कॉन्सेप्ट्स प्रोग्रॅम म्हणजेच नवीन संकल्पनांवर काम करण्यासंर्भातील उपक्रम आणि अ‍ॅडव्हायझरी काऊन्सीलसाठी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संकल्पा आणि अभियांत्रिकी सल्लागार समितीच्या सदस्य देखील होत्या.
त्या इन्स्टीट्यूट ऑफ डिफेन्स अ‍ॅनालिसिस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी पॉलिसी इंन्स्टीट्यूटमध्ये (एसटीपीआय) रिसर्च स्टाफ म्हणून २००५ ते २०२० दरम्यान कार्यरत होत्या.
एसटीपीआय मध्ये सहभागी होण्याअगोदर त्या सी-सटीपीएस एलएलसीच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत.
त्यापूर्वी भाव्या यांनी केंब्रिजमधल्या मैसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण अभ्यास केंद्राचे संचालक पद भूषवलं आहे. अमेरिकेच्या न्यूक्लिअर सोसायटीच्या अण्वस्त्रविषयक वार्षिक परिषदेच्या अध्यक्षस्थानीही भाव्या यांची नियुक्ती करण्यात आली होती.
भाव्या लाल या नासामधील वरिष्ठ आर्थिक सल्लागार म्हणूनही काम पाहणार आहे. कोणत्या अंतराळ मोहिमांसाठी किती खर्च करण्यात यावा याचसोबत इतर आर्थिक सल्ले देण्याची जबाबदारी आता भाव्या यांच्या खांद्यावर असणार आहे.

अर्थसंकल्प 2021

What does Union Budget 2017-18 mean for India's youth? – Thoughts Around We  The People

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सोमवारी संसदेत सादर. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प आहे.
२०२१-१२ च्या अर्थसंकल्प – Six Pillars :
आरोग्य व कल्याण – (Health & Well-being)
आर्थिक भांडवल आणि पायाभूत सुविधा – (Physical & financial Capital & Infrastructure)
महत्वाकांक्षी भारतासाठी समावेशक विकास – (Inclusive development for Aspirational India)
मानवी भांडवलाची पुनरुज्जीवन – (Reinvigorating Human capital)
नूतनीकरण आणि अनुसंधान व विकास – (Innovation & R&D)
किमान सरकार आणि कमाल शासन – (Minimum Govt & Maximum Governance)
नवीन आरोग्य योजना : पंतप्रधान आत्मनिभार स्वास्थ्य भारत योजना ६४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली
जल जीवन मिशन योजनेसाठी दोन लाख ८७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.
विमा क्षेत्रात 74 टक्क्यांपर्यंत परदेशी गुंतवणूक करता येणार आहे. आधी इथे केवळ 49 टक्क्यांपर्यंत गुंतवणुकीची मंजुरी होती. याशिवाय गुतंवणूकदारांसाठी चार्टर बनवण्याची घोषणा केली आहे.
सरकार शेतकरी हितासाठी वचनबद्ध आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दीष्ट असून गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीकरता तरतूद असल्याची निर्मला सीतारामन यांची माहिती.
“स्वामित्व योजना आता देशभरात लागू केली जाणार आहे. कृषी क्षेत्रातील क्रेडिट टार्गेट 16 लाख कोटींपर्यंत वाढवण्यात येणार आहे.”
१०० नव्या सैनिक स्कूलची अर्थमंत्र्यांनी घोषणा केली आहे.लेहमध्ये केंद्रीय यूनिवर्सिटी बनवली जाईल. याशिवाय अनुसूचित जातीच्या 4 कोटी विद्यार्थ्यांसाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिली डिजिटल जणगणना करण्यात येणार आहे. यासाठी तीन हजार ६८ कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.

Share This Article