Current Affairs : 03 February 2021
Jeff Bezos यांचा Amazon च्या सीईओ पदावरून राजीनामा

Amazon चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
या वर्षाअखेरपर्यंत ते त्यांचे पद सोडतील.
एडब्ल्यूएसचे सीईओ अँडी जेसी (Andy Jassy) या वर्षातील तिसऱ्या तिमाहीमध्ये जेफ बेझोस यांचे स्थान घेतील. यासह जेफ बेझोस यांनी अशी माहिती दिली आहे की, ते बोर्डचे कार्यकारी अध्यक्ष असतील.
बेझोस यांनी स्टार्टअपच्या स्वरुपात अॅमेझॉनची स्थापना केली होती.
आता अॅमेझॉन ही कंपनी जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी बनली आहे.
अॅमेझॉनमधील भागीदारीमुळे जेफ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
त्यांच्या या कंपनीने 2020 च्या शेवटच्या तीन महिन्यात 100 बिलियन डॉलरची विक्री केली होती. ज्यामुळे अॅमेझॉनला होणारा नफा रेकॉर्ड स्तराने वाढला होता.
मलेरिया मोहिमेसाठी भारतीय वंशाचे डॉक्टर जागतिक समन्वयक

अमेरिकेतील जो बायडेन प्रशासनाने डॉ. राज पंजाबी यांची नेमणूक मलेरिया नियंत्रण मोहिमेचे समन्वयक म्हणून केली असून ते भारतीय वंशाचे आहेत.
आफ्रिका व आशियायी देशातून मलेरियाचे उच्चाटन करण्याचा उद्देश या मोहिमेत आहे.
लायबेरियात जन्मलेले पंजाबी व त्यांचे कुटुंबीय तेथील यादवी युद्धानंतर अमेरिकेत पळून आले होते व १९९० मध्ये शरणार्थी म्हणून आयुष्य जगत होते.
मलेरिया निर्मूलनाच्या लक्ष्यात ते युनाटेड स्टेटस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट व सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेच्या वतीने समन्वयाचे काम करतील.
अमेरिकी अध्यक्षांच्या मलेरिया निर्मूलन मोहिमेची सुरुवात २००५ मध्ये झाली त्यात २४ देश सहभागी असून आग्नेय आशिया व ग्रेटर मेकाँग, आफ्रिका या भागात मलेरिया आटोक्यात आणण्याचे उद्दिष्ट त्यात आहे.
सात्त्विक, अश्विनीची क्रमवारीत आगेकूच

आशियाई टप्प्यातील स्पध्रेत शानदार कामगिरी करणाऱ्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या भारताच्या मिश्र दुहेरीतील जोडीने ताज्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल २० जणांमध्ये मजल मारली आहे.
सात्त्विक आणि अश्विनी जोडीने जागतिक मालिकेतील सुपर १००० दर्जाच्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती.
या जोडीने १६ स्थानांनी आगेकूच करीत १९वे स्थान गाठले आहे.
सात्त्विक-अश्विनीने उपांत्यपूर्व सामन्यात मलेशियाच्या पाचव्या मानांकित चॅन पेंग सून आणि गोह लिऊ यिंग यांच्यावर मात केली होती.
पुरुष दुहेरीत सात्त्विक आणि चिराग शेट्टी जोडीने थायलंड खुल्या स्पध्रेची उपांत्य फेरी गाठून जागतिक क्रमवारीमधील १०वे स्थान टिकवले आहे.
विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूनेही महिला एकेरीतील आपले सातवे स्थान कायम राखले आहे.
सायना नेहवालने एका स्थानाने सुधारणा करीत १९ वे स्थान मिळवले आहे.
पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतने एका स्थानाने आगेकूच करीत १३ वे स्थान गाठले आहे, तर समीर वर्माने चार स्थानांनी सुधारणा करीत २७ वे स्थान गाठले आहे.
बी. साईप्रणीतची १७व्या स्थानावर घसरण झाली आहे. पारुपल्ली कश्यपची दोन स्थानांनी घसरण झाली असून, तो २६ व्या स्थानावर आहे.
एम. आर. अर्जुन आणि ध्रुव कपिला यांनी ३३ स्थानांनी सुधारणा करीत पुरुष दुहेरीत ६४ वे स्थान मिळवले आहे.
‘आत्मनिर्भरता’ हा २०२० चा हिंदी वर्ड ऑफ द इयर
ऑक्सफर्ड लँग्वेजेसने ‘आत्मनिर्भरता’ला वर्ष २०२० चा हिंदी वर्ड ऑफ द इयर घोषित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शब्दाचा उल्लेख कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करताना केला होता.
२०१९ मध्ये ‘संविधान’ या शब्दाची निवड झाली होती.