⁠  ⁠

चालू घडामोडी : ०५ एप्रिल २०२१

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

प्रमोद भगतला तीन पदकेpromad bahagat

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या प्रमोद भगतने दुबई पॅराबॅडमिंटन स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक कांस्य अशी एकूण तीन पदके मिळवली.
याचप्रमाणे क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सुकांत कदमने दोन रौप्यपदके कमावली.
‘एसएल४’ गटात प्रमोदने एकेरीत कुमार नितेशवर २१-१७, २१-१८ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. त्यानंतर दुहेरीत मनोज सरकारच्या साथीने सुकांत कदम आणि नितेश कुमार जोडीचा २९ मिनिटांत २१-१८, २१-१६ असा पराभव केला.
मिश्र दुहेरीत प्रमोदने पाला कोहलीच्या साथीने कांस्यपदक मिळवले. ‘एसएल३’ गटात एकेरीच्या अंतिम फेरीत फ्रान्सच्या लुकास मॅझूरकडून २१-१५, २१-६ अशा फरकाने पराभव पत्करल्याने सुकांतला उपविजेतेपद मिळाले.

अहमदनगरमधील चार सायकलस्वारांचं नाव ‘हॉल ऑफ फेम’मध्ये नोंदCyclists

अहमदनगरमधील चार सायकलस्वारांनी माऊंट एव्हरेस्टच्या उंची इतकी सायकल चालवून माऊंट एव्हरेस्टला गवसणी घातली.
त्यामुळे त्यांचे नाव ‘हॉल ऑफ फेम’मध्ये नोंदविले गेले आहे. सायकलिस्ट शरद काळे पाटील, उदय टीमकरे, सागर काळे व शशिकांत आवारे यांनी हा मान मिळवला आहे.
माउंट एव्हरेस्टची उंची ८८४८ मीटर (२९०२९ फूट) आहे. सायकलस्वाराने हे अंतर एखादया टेकडी अथवा डोंगरावर वरखाली करून तितकी उंची गाठायची असते. हे पूर्ण केल्यास त्याचे नाव हॉल ऑफ फेममध्ये नोंदविले जाते.
आजपर्यंत जगातील १५८३४ स्पर्धकांनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे. भारतातील फक्त १५२ स्पर्धकांनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे. त्यात १३५ पुरुष तर १७ महिला आहेत.

झी मराठी अवॉर्ड्समध्ये ‘माझा होशील ना’ मालिकेचा डंकाZee Marathi Awards : झी मराठी अवॉर्ड्समध्ये सई-आदित्यची बाजी, 'माझा होशील  ना' मालिकेचा डंका | Sai-Aditya won in Zee Marathi Awards, 'Mazha Hoshil Na'  serial | TV9 Marathi

‘झी मराठी अवॉर्ड्स 2020-21’ मध्ये ‘माझा होशील ना’ ही सर्वोत्कृष्ट मालिका ठरली.
सईच्या भूमिकेसाठी अभिनेत्री गौतमी देशपांडेला सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार मिळाला, तर ओमच्या व्यक्तिरेखेसाठी अभिनेता शल्व किंजवडेकर सर्वोत्कृष्ट नायक ठरला.

Share This Article