⁠  ⁠

चालू घडामोडी : ०५ ऑगस्ट २०२०

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Current Affairs 05 August 2020

प्रवीण परदेशी संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनियुक्तीवर

pravin pardeshi
  • अतिरिक्त मुख्य सचिव (नगरविकास व जलसंपदा) प्रवीण परदेशी यांची संयुक्त राष्ट्रसंघात नियुक्ती झाली असून, केंद्र सरकारने परदेशी यांच्या परदेशातील सेवेस मान्यता दिली.
  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्त विषयक समितीने परदेशी यांच्या संयुक्त राष्ट्रसंघातील ११ महिन्यांच्या प्रतिनियुक्तीस मान्यता दिली.
  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रशिक्षण आणि संशोधन विभागात आंतरराष्ट्रीय कार्यक्रम विभागाचे समन्वयक म्हणून परदेशी यांची नियुक्ती झाली आहे.
  • जिनीव्हामध्ये परदेशी यांचे कार्यालय असेल.
  • केंद्राच्या मान्यतेनंतर परदेशी यांना राज्याच्या सेवेतून तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले.
  • लातूर भूक पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम यशस्वीपणे केल्यानंतर परदेशी यांनी सात वर्षे संयुक्त राष्ट्रसंघात नैसर्गिक आपत्तीनंतरचे पुनर्वसन या महत्वाच्या क्षेत्रात काम केले होते.
  • प्रवीण परदेशी यांना राज्याच्या सेवेतून कार्यमुक्त करण्यात आल्यावर राज्य शासनाने नगरविकास विभागाच्या सचिवपदी अतिरीक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांची नियुक्ती केली.

फुटबॉलपटू कॅसियासची निवृत्ती

Untitled 30
  • स्पेनला २०१० मध्ये विश्वचषक जिंकून देणारा फुटबॉलपटू आणि गोलरक्षक इकेर कॅसियासने अखेर खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे.
  • कॅसियास पोर्तुगालमधील पोटरे संघाशी २०१५ मध्ये करारबद्ध झाला होता. मात्र गेल्या वर्षी मे महिन्यात त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तेव्हापासून तो स्पर्धात्मक फुटबॉल खेळलेला नाही.
  • ३९ वर्षीय कॅसियासने रेयाल माद्रिदकडून पाच वेळा ला-लिगा विजेतेपद पटकावले असून तीन वेळा चॅँपियन्स लीग जिंकली आहे. कॅसियासच्या नेतृत्वाखाली स्पेनने २०१० मध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे.
  • कॅसियास या वर्षी स्पेन फुटबॉल महासंघाकडून अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार होता. मात्र स्पेनमध्ये करोना संसर्ग मोठय़ा प्रमाणात पसरल्याने निवडणुकीतून कॅसियासने माघार घेतली.

Share This Article