Current Affairs 06 March 2020
आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी पुरस्कार 2020 प्रदान
आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना राजकारणासाठी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी पुरस्कार 2020 प्रदान करण्यात आला.
गुजरातमधील सहाव्या भारत विचार परिषदेत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि मालदीवच्या पीपल्स मजलिसचे अध्यक्ष मोहम्मद नाशीद यांनी हा पुरस्कार प्रदान केला. राष्ट्र एकसंध करण्याच्या आणि मुखर्जींच्या दृष्टी आणि तत्त्वज्ञानाचे कार्य पुढे केल्याबद्दल त्यांचा गौरव झाला.
या पुरस्कारामध्ये सन्मानपत्र, खास डिझाईन ट्रॉफी आणि १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.
११ वी राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र परिषद, २०२०: दिल्ली
राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र परिषदेची 11 वी आवृत्ती भारतीय कृषी संशोधन परिषदेच्यावतीने 28 फेब्रुवारी 2020 ते 1 मार्च 2020 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित केली होती.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण, ग्रामविकास व पंचायती राजमंत्री यांच्या 11 व्या राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र परिषदेचे उद्घाटन.
या परिषदेची थीम ‘तंत्रज्ञानावर आधारित शेतीसाठी तरुणांना सक्षम बनविणे’ आहे.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मते कृषी विज्ञान केंद्रे प्रयोगशाळेतील आणि शेतातील दुवा म्हणून काम करतात.
१९४७ मध्ये पुडुचेरी येथे पहिले कृषी विज्ञान केंद्र बांधल्यानंतर आता संपूर्ण देशात ७१७ कृषी विज्ञान केंद्रे कार्यरत आहेत.
ईपीएफओच्या व्याजदरात कपात
भविष्यनिर्वाह निधीच्या व्याज दरात कपात करण्यात आली आहे. आता नवीन व्याज दर 8.5 टक्के असून हा 7 वर्षांचा नीचांक आहे.
गेल्या वर्षी भविष्य निर्वाह निधीवर 8.65 टक्के इतका व्याज दर होता.
कर्मचाऱ्यांना 8.5 टक्के इतका व्याज दर दिल्यानंतर भविष्यनिर्वाह निधी संघटनेकडे अतिरिक्त 700 कोटी रुपये राहणार आहेत.
महिला उद्योजक परिषदेत
राजव्यापी एकदिवसीय महिला उद्योजक परिषद नुकतीच राजा शिवाजी विद्यालय, दादर येथे झाली. याचे आयोजन आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानने केले होते. एकूण पाच सत्रांमध्ये झालेल्या या परिषधेत महाराष्ट्र, गोवा, बेंगळुरू व दुबई येथील आम्ही उद्योगिनीच्या शाखांतून महिला उद्योजक आल्या होत्या. परिषदेत राज्यातील प्रत्येक विभागातील यशस्वी उद्योजक महिलांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
गेल्यावर्षीपासून उद्योगलक्ष्मी ही स्पर्धा आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे घेण्यात येते.
यंदा या स्पर्धेत ३५ महिला उद्योजकांनी भाग घेतला होता. २०२० साठी उद्योगलक्ष्मी होण्याचा मान औरंगाबाद शाखेच्या आरती दुग्रेकर यांनी मिळवला. पणजी येथील श्रद्धा सावंत यांनी द्वितीय तर पुण्याच्या सायली दातार यांनी तृतीय क्रमांक पटकावला.