चालू घडामोडी : ०६ ऑक्टोंबर २०२०
Current Affairs : 06 October 2020
Nobel Prize 2020: हार्वे अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स राईस यांना वैद्यकशास्त्रातला नोबेल जाहीर
यंदाचा (२०२०) वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हार्वे जे. अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स एम. राईस यांना जाहीर झाला आहे.
या तिघांना ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधासाठी या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे.
रक्तातील ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूमुळे सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार होतात. या आजारांसी लढा देण्यासाठी या तिन्ही वैज्ञानिकांनी निर्णायक योगदान दिले आहे.
या वैज्ञानिकांच्या योगदानामुळे इतिहासात प्रथमच, हिपॅटायटीस सी विषाणूंमुळे होणारे आजार आता बरे होऊ शकतात. मानवजातीसाठी वरदान ठरलेल्या या संशोधनामुळे यासंबंधीच्या आजारांसाठी संभाव्य रक्त चाचण्या करता येणे शक्य झाले तसेच लाखो लोकांचे जीवन वाचविणारी नवीन औषधेही तयार केली गेली.
भारतातील २५ कोटी लोकांना २०२१ च्या जुलैपर्यंत देणार कोरोनाची लस
भारतात कोरोना प्रतिबंधक लसीची २/३ टप्प्यातील चाचणी सुरू आहे. भारतीय वैज्ञानिकांनी यांपैकी दोन लसी या विकसित केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन ‘संडे संवाद’ या कार्यक्रमाद्वारे कोरोना लसीसह महत्त्वाची माहिती दिली आहे.
भारतातील कोट्यवधी लोकांपर्यंत जुलै २०२१ पर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतात ४०० ते ५०० दशलक्ष डोस देण्याची सरकारची योजना आहे. पुढच्या वर्षाच्या जुलै महिन्यापर्यंत साधारणपणे भारतातील २० ते २५ कोटी लोकांना ही लस देण्याचे लक्ष्य आहे. ही लस सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच कोणत्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबर अखेरपर्यंत सूचना मागवल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस एक्स्प्रेस’ची पहिली तुकडी रुळावर
पूर्णतः भारतीय बनावटीच्या ‘तेजस एक्सप्रेस’ या रेल्वे इंजिनाची पहिली तुकडी रुळावर दाखल झाली आहे. येथील रेल्वे स्थानकात इंजिनाच्या शिल्पकारांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ‘तेजस’चे उदघाटन करण्यात आले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या ‘तेजस’चे उत्पादन प. बंगालमध्ये ‘चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स’ येथे करण्यात आले आहे.
रेल्वेला पुढे खेचण्यासाठी आणि मागून पुढे ढकलण्यासाठीही या इंजिनाचा उपयोग करता येणार आहे. इंजिनाचा वेग तशी १६० किलोमीटर आहे.
‘तेजस’च्या रूपाने देशाने ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे, अशा शब्दात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या इंजिनाचे स्वागत केले आहे. स्वदेशी बनावटीचे इंजिन अत्याधुनिक स्वरूपाचे आणि ऊर्जेची बचत करणारे आहे, अशी माहिती त्यांनी ‘ट्विटर’द्वारे दिली आहे