⁠  ⁠

चालू घडामोडी : ०७ जानेवारी २०२१

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

Current Affairs : 07 January 2021

ठाण्याची श्रुतीका माने ठरली ‘ऑस्ट्रेलिया मिस इंडिया’ची विजेती

Shrutika Mane | भारतीय नारी जगात भारी! 'ठाण्याची लेक' श्रुतिका माने ठरली 'ऑस्ट्रेलिया  मिस इंडिया'ची विजेती | Shrutika Mane a girl from thane wins Australia miss  India beauty ...

ठाण्यातील प्रसिध्द डॉक्टर संदीप माने व राजश्री माने यांची कन्या श्रुतिका माने ही ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत पहिली आली.
ठाण्याची श्रुतिका माने ही ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या ‘मिस इंडिया’ सौंदर्य स्पर्धेत पहिली आली.
२००१ साली सिडनी-ऑस्ट्रेलिया येथे ऑस्ट्रेलियास्थित भारतीय राज सुरी यानी मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेला सुरूवात केली.
ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबई येथे होत असलेल्या मिस इंडिया जागतिक स्पर्धेसाठी श्रुतिका माने ऑस्ट्रेलियातर्फे प्रतिनिधीत्व करणार आहे.

आयफेल टॉवर’ इतके मोठे दोन उल्कापिंड पृथ्वी जवळून जाणार

two asteroids as big as Eiffel Tower to zoom past Earth today | मोठ्या संकटाची चाहूल... 'आयफेल टॉवर' इतके मोठे दोन उल्कापिंड आज पृथ्वी जवळून जाणार

अवकाशात काही उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचं निदर्शनास आलं आहे.
अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने (नासा) दिलेल्या माहितीनुसार एकूण सहा उल्कापिंड ६ जानेवारी रोजी पृथ्वीच्या जवळून जाणार आहेत.
यातील दोन उल्कांचा आकार तर पॅरिसमधील सुप्रसिद्ध ‘आयफेल टॉवर’पेक्षाही मोठा आहे.
पृथ्वीच्या जवळून जाणाऱ्या सहा उल्कांपैकी एक २०२१ एसी हे उल्कापिंड आज सकाळीच पृथ्वी जवळून गेले आहे.
या उल्कापिंडाचा सरासरी व्यास ७३.५ मीटर इतका होता, तर त्याचा वेग तब्बल ५०,६५२ किमी प्रतितास इतका प्रचंड होता. २०१६ सीओ २४७ नावेच्या दुसऱ्या उल्कापिंडाचा सरासरी व्यास हा तब्बल ३४० मीटर इतका मोठा आहे.
तर सरासरी वेग ६०,२२८ किमी इतका आहे. पृथ्वीपासून ७.४ दशलक्ष किमी अंतरावरुन हे उल्कापिंड गेले आहेत.
२००८ एएफ४ या उल्कापिंडचा सरासरी व्यास तब्बल ५०० मीटर इतका आहे. महत्वाची बाब अशी की हे भव्य उल्कापिंड पृथ्वीवर आदळले तर सर्वात मोठा अणुबॉम्ब जितकं नुकसान करू शकतो तितकंच नुकसान यातून होऊ शकतं.
हे उल्कापिंड तब्बल ३९,६५४ किमी प्रतितास वेगाने प्रवास करत आहे. सुदैवाने हे उल्कापिंड पृथ्वीपासून १५ दशलक्ष किमी अंतरावरुन जाणार असून पृथ्वीला याचा कोणत्याही प्रकारचा धोका नाही.

हवेत मारा करणाऱ्या संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी

947971 drdo israel e1609946841431

मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
भारत आणि इस्रायलने हवाई सुरक्षेसाठी ही यंत्रणा संयुक्‍तपणे विकसित केली आहे.
भारतीय सुविधेद्वारे गेल्या आठवड्यात घेतल्या गेलेल्या या चाचणीदरम्यान निकषांची पूर्तता झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
“एमआरएसएएम’ ही यंत्रणा हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीतील आधुनिक यंत्रणा असून याद्वारे अवकाशातील 50-70 किलोमीटर उंचीवरील शत्रूचे विमान पाडले जाऊ शकेल, असे तज्ञांनी म्हटले आहे.
“इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज’ आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात “डीआरडीओ’ने संयुक्‍तपणे आणि दोन्ही देशातील संरक्षण कंपन्यांबरोबरच्या भागीदारीतून विकसित केलेल्या या प्रणालीचा वापर दोन्ही देशांच्या लष्कर, हवाई दल आणि नौदल या तिन्ही संरक्षण दलांमध्ये वापर केला जाणार आहे.
या प्रणालीमध्ये आधुनिक रडार, कमांड आणि कंट्रोल, मोबाइल लॉंचर, ऍडव्हान्स आरएफ सीकरच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या इंटरसेप्टरचाही समावेश आहे.

mpsc telegram channel

Share This Article