अमेरिकेत जन्मदरात सहाव्या वर्षीही घट
अमेरिकेत सलग सहाव्या वर्षी जन्मदरात घट झाल्याचे दिसून आले. ११२ वर्षांत हे प्रमाण नीचांकी पातळीवर पोहोचले.
२०१९ च्या तुलनेत त्यात ४ टक्के घट झाली. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) यांच्या ताज्या अहवालातून हा दावा करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी जारी झालेल्या ९९ टक्के जन्म प्रमाणपत्रांच्या विश्लेषणाच्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आला. १९७९ नंतर ही सर्वाधिक घट मानली जाते. जन्मदर घटण्यामागील प्रमुख कारणांत चिंता, घबराट व आर्थिक स्थिती खालावणे इत्यादींचा समावेश आहे. त्यामुळे महिलांनी महामारीच्या काळात आई होणे टाळले. अमेरिकेत जन्मदर १००० महिलांमागे ५६ आहे. इतिहासाच्या तुलनेत तो सर्वात कमी आहे. अमेरिकेत काही काळापूर्वी हे प्रमाण २.१ होते. आता घट होऊन ते १.६ झाले आहे.
गेल्या दहा वर्षांत त्यात सातत्याने घट होत आहे. अमेरिकेत गेल्या वर्षी सुमारे ३६ लाख मुले जन्माला आली होती. २०१९ मध्ये ३८ लाख होते. २००७ मध्ये ही संख्या ४३ लाख होती. अमेरिकेव्यतिरिक्त इतर युरोपीय देशांतही जन्मदर घटला आहे.
इटलीत लॉकडाऊननंतर जन्मदर २२ टक्क्यांवर आला होता.
तिहेरी खात्यासाठी जिओजित-पीएनबी सामंजस्य करार
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस पंजाब नॅशनल बँकेबरोबर (पीएनबी) तिच्या ग्राहकांना ‘थ्री-इन-वन’ खात्याचा लाभ देण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
या सेवेअंतर्गत, पीएनबीचे बचत खाते, पीएनबीचे डिमॅट खाते आणि जिओजितचे ट्रेडिंग खाते असे गुंतवणूकदृष्ट्या सोयीस्कर तिहेरी खाते ग्राहक उघडले जाऊ शकेल.
पीएनबीमध्ये बचत आणि डिमॅट खाते विनासायास आणि ऑनलाइन पद्धतीने उघडता येते. तर कोणत्याही कागदपत्रांविना केवळ १५ मिनिटांत ऑनलाइन उघडता येणारे ट्रेडिंग खाते सुविधा जिओजितर्फे देण्यात आली आहे, शिवाय विविध गुंतवणुकीच्या पर्यायात ऑनलाइन पद्धतीने गुंतवणूक करण्याची सुविधा व सक्षमता ग्राहकांना प्रदान केली जाते.
जिओजितने अशाच प्रकारचे सामंजस्य हे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी), जी आता युनियन बँकेसह पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) विलीन झाली आहे.
आर. एम. सुंदरम: ICAR-भारतीय तांदूळ संशोधन संस्थेचे नवीन संचालक
आर. एम. सुंदरम एक वैज्ञानिक आहेत, जे तांदूळ संशोधनाशी जुळलेल्या जैवतंत्रज्ञान, आण्विक प्रजनन आणि जीनोमिक्स क्षेत्रात कार्य करतात. त्यांनी तांदळाच्या ‘सुधारित सांबा महसूरी’ नामक एका वाणाचा विकास केलेला आहे.
भारतीय तांदूळ संशोधन संस्था (ICAR-IIRR) विषयी
भारतीय तांदूळ संशोधन संस्था ही भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) याच्या अंतर्गत कार्य करणारी एक प्रमुख संस्था आहे, जी तांदूळ / भात उत्पादनाच्या क्षेत्रात संशोधन कार्ये चालविते. संस्थेची स्थापना 1965 साली झाली. संस्था तेलंगणा राज्यातील हैदराबाद जवळ राजेंद्रनगर येथे आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) ही कृषी क्षेत्रात संशोधनात्मक कार्ये करणारी संस्था आहे. संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. परिषदेची स्थापना 16 जुलै 1929 रोजी झाली.