Current Affairs : 08 February 2021
ट्विटर इंडियाच्या प्रमुख महिमा यांचा राजीनामा
ट्विटरच्या भारतातील पब्लिक पॉलिसी हेड महिला कौल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
महिमा कौल यांनी २०१५ मध्ये मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर जॉइन केले होते.
महिमा कौल मार्च अखेरपर्यंत ट्विटरसोबत काम करतील आणि त्यांची जबाबदारी निभावतील
महिमा कौल ट्विटरच्या भारत आणि दक्षिण आशिया पब्लिक पॉलिसी डायरेक्टर आहेत.
ट्विटरसाठी भारत तिसर्या क्रमांकाचे मार्केट आहे.
अमेरिका आणि जपान अनुक्रमे पहिले आणि द्वितीय क्रमांकावर आहेत.
भारतात ट्विटरचे कोट्यवधी यूजर्स आहेत, ज्यामध्ये अभिनेते, खेळाडू, सरकारी अधिकारी, राजकारणी आणि इतर व्यक्तींचा समावेश आहे.
सुब्रमण्यम यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
एस.एन.सुब्रह्मण्यन यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांचा अनुभव राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला मार्गदर्शक ठरणार आहे नवीन व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कार्यकारी अटींच्या संहिता, 2020 (ओएसएच कोड, 2020) अंतर्गत कामाच्या ठिकाणी सुरक्षा पुरवण्यासाठी त्यांची नियुक्ती महत्वाची ठरेल.
एल अँड टी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सुब्रह्मण्यन हे प्रख्यात अभियंता असून त्यांनी अनेक वर्षांपासून एल अँड टी च्या पायाभूत सुविधांच्या व्यवसायाचे नेतृत्व केले आहे.
तसेच कंपनीला देशातील सर्वात मोठी बांधकाम कंपनी म्हणून तसेच जगातील 14 व्या स्थानावर आणून नावारूपाला आणले आहे.
एल अँड टी ही देशातील सर्वात मोठ्या अभियांत्रिकी कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी अभियांत्रिकी, संरक्षण, जहाज इमारत इत्यादी क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.
CRPFच्या कोब्रा पथकात महिलांचा समावेश; जगातील ही पहिलीच ‘महिला बटालीयन’
केंद्रीय राखीव पोलीस दलाने त्यांच्या प्रतिष्ठित अशा कमांडो बटालियन फॉर रेझ्युल्यूट ऍक्शन (कोब्रा) या पथकात प्रथमच 34 महिलांचा समावेश करण्यात आले आहे.
कोब्रा पथकात दलाच्या 35व्या रायझिंग दिनी समावेश करण्यात आला. त्यावेळी 88वी महिला बटालीयन बनवण्यात आली.
अशा स्वरूपाची जगातील ही पहिलीच महिला बटालीयन आहे. महिला सक्षमीकरणाचे ठाम पाऊल असल्याचे दलाच्या निवेदनात म्हटले आहे.