Current Affairs : 08 January 2021
पोलिस महासंचालकपदाचा कार्यभार हेमंत नगराळेंकडे
राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) सुबोध जयस्वाल यांची सीआयएसएफ महासंचालकपदी निवड झाली. त्यामुळे पोलिस महासंचालक या पदाचा अतिरिक्त कारभार १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. नगराळे सध्या कायदा व तांत्रिक विभागाचे डीजीपी आहेत.
राज्यात ३ अधिकारी पोलिस महासंचालकपदाच्या दर्जाचे आहेत. त्यात नगराळे यांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या शिफारशींवर केंद्रीय लोकसेवा आयोग पोलिस महासंचालकांची निवड करते.
एलन मस्क बनले जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती
स्पेसएक्स आणि टेस्ला या जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपनीचे संस्थापक एलन मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
त्यांनी दिग्गज अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस यांना मागे टाकत हा किताब पटकावला.
मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत ५०० लोकांच्या ब्लूमबर्गच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचले.
दक्षिण अफ्रेकत जन्मलेल्या मस्क यांची काल १८८.५ अब्ज डॉलर संपत्तीची नोंद झाली.
ही बेजोस यांच्या तुलनेत १.५ अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत एलन मस्क यांच्या संपत्तीत बरीच वाढ झाली आहे. एका निरिक्षणानुसार, गेल्या वर्षी मस्क यांच्या संपत्तीत १५० अब्ज डॉलरपेक्षा अधिक वाढ झाली. चांगला फायदा झाल्याने गेल्या वर्षी टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीत ७४३ टक्के वाढ झाली. सहा जानेवारीपर्यंत एलन मस्क यांची संपत्ती १८१ अब्ज डॉलरवर पोहोचली होती. तेव्हापासूनच बेजोस यांचे अव्वल स्थान डळमळीत झाले होते.
इस्रायलशी संबंध सुधारण्यासाठी सुदानचा अमेरिकेबरोबर करार
इस्रायलबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी सुदानने अमेरिकेबरोबर महत्वाचा करार केला आहे.
इस्रायल आणि आखाती देशांबरोबरचे संबंध सुधारण्याच्या दृष्टीने यापूर्वी “अब्राहम करार’ करण्यात आला आहे. त्यावर संयुक्त अरब अमिराती आणि बहारीन या आखाती देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
आता सुदान हा त्या करारामध्ये सहभागी होणारा तिसरा आखाती देश ठरला आहे.
महिन्याभरापूर्वीच अमेरिकेने सुदानला दहशतवादी देशांच्या काळ्या यादीतून बाहेर काढले होते. त्यानंतर सुदानमधील सरकारबरोबर अमेरिकेच्या वाटाघाटी सुरू होत्या.
एप्रिल 2019 मध्ये सुदानचे अध्यक्ष उमर अल बशीर यांना पदच्युत करून तेथे नागरी सरकार सत्तेवर आले.
या सरकारने अमेरिकेबरोबरचे मित्रत्वाचे संबंध पहिल्यापासूनच जपायला सुरुवात केली आहे.
सुदानने इस्रायलबरोबर मैत्रीचे संबंध ठेवण्याच्या भूमिकेने जागतिक बॅंकेनेही सुदानला 1 अब्ज डॉलरचे अर्थसहाय्य देण्याचे मान्य केले आहे.
करोनामुळे विकास दर उणे 7.7 % होणार; केंद्र सरकारचा अंदाज
2020-21 या आर्थिक वर्षाचा विकास दर करोनामुळे कमी होऊन उणे 7.7 टक्के होणार आहे.
गेल्या वर्षाचा विकास दर 4.2 टक्के इतका होता. पहिल्या तिमाहीचा विकास दर उणे 23.9 टक्के झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत विकास दर उणे 7.5 टक्के आहे.
उरलेल्या दोन तिमाहीतील विकास दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण वर्षाचा विकास दर उणे 7.7 टक्के होईल असे या विभागाला वाटते. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा विकास दर उणे 9.4 टक्के होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी या क्षेत्राचा विकासदर 0.03 टक्के इतका होता. खाण, व्यापार, हॉटेल वाहतूक, दूरसंचार आणि सेवा क्षेत्राच्या विकास दरावर परिणाम झाला आहे. यावर्षी कृषी क्षेत्राचा विकास दर मात्र 3.4 टक्के होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी या क्षेत्राचा विकासदर चार टक्के होता.
बहुतांश पतमानांकन संस्थांनी या वर्षाचा विकास दर उणे दहा टक्क्यांपेक्षा कमी होईल असे सुरुवातीला म्हटले होते. मात्र नंतर भारतीय अर्थव्यवस्थेने वेगात सुधारणा केली आहे. त्यामुळे आता या सर्व पतमानांकन संस्था विकासदराचे भाकीत बदलत आहेत. सरकारने या वर्षाचा विकास दर 7.7 टक्के होईल असे म्हटले आहे.