⁠  ⁠

Current Affairs 09 April 2019

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

पाच वर्षांत मोदींचे रेकॉर्डब्रेक परदेश दौरे

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर 443.4 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. याबद्दलचं बिल एअर इंडियानं पंतप्रधान कार्यालयाला
  • पाठवलं आहे. मात्र यामध्ये एअर इंडियानं मोदींच्या पाच परदेश दौऱ्यांच्या खर्चाचा समावेश केलेला नाही.
  • मोदींनी मे 2014 पासून 44 आंतरराष्ट्रीय दौरे केले. याआधी कोणत्याही पंतप्रधानानं मोदींइतके परदेश दौरे केलेले नाहीत, अशी माहिती
  • पंतप्रधान कार्यालयानं दिली.
  • पंतप्रधान मोदी या महिन्याच्या अखेरीस संयुक्त अरब अमिरातला जाण्याची शक्यता आहे. संयुक्त अरब अमिरातनं नुकताच मोदींना
  • सर्वोच्च नागरी सन्मान घोषित केला. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांबद्दल मोदींना हा सन्मान देण्यात येणार
  • आहे. त्यासाठी मोदी महिन्याच्या शेवटी संयुक्त अरब अमिरातला जाऊ शकतात. मोदींनी सर्वाधिक परदेश दौरे केले असले, तरी माजी
  • पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तुलनेत त्यांच्या दौऱ्यांचा खर्च कमी आहे. मनमोहन सिंग यांनी 2009 ते 2014 या कालावधीत 38 परदेश दौरे केले. यासाठी 493.22 कोटी रुपयांचा खर्च आला. मोदींच्या परदेश दौऱ्याच्या तुलनेत हा खर्च 50 कोटींनी जास्त आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांची एव्हरेस्ट मोहीम

  • उत्तुंग शिखर पार करण्यासाठी लागणारे विलक्षण धैर्य, आत्मविश्वास आणि कठोर मेहनत अशा विविध कसोटय़ांवर यशस्वी ठरलेले राज्यातील शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांतील ११ आदिवासी विद्यार्थी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या पथकात पालघरमधील एका विद्यार्थ्यांचा समावेश असून नुकतेच काठमांडू येथे हे पथक रवाना झाले.
  • आदिवासी विकास विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन शौर्य २०१९’ या मोहिमेअंतर्गत राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध होत असून या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सहय़ाद्री अतिथिगृह येथे ५ एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • देशासाठी आदर्श संघटक घडावेत या उद्देशाने आदिवासी विकास विभागातर्फे ‘मिशन शौर्य’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी पाच आदिवासी विद्यर्थ्यांनी एव्हरेस्ट सर करीत साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते.
  • या वर्षी मोहिमेच्या दुसऱ्या पर्वात पालघरसह मेळघाट, धुळे, पांढरकवडा, नाशिक येथील आदिवासी पाडय़ावरील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. मुन्ना धिकार, शिवचरण भिलावेकर, सुग्रीव मंदे, सुषमा मोरे, अंतुबाई कोटनाके, सूरज आडे, मनोहर हिलीम, चंद्रकला गावित, हेमलता गायकवाड, केतन जाधव, अनिल कुंदे हे विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

विटा तालुक्यात चालुक्यकालीन कन्नड लिपीतील शिलालेख

  • विटा तालुक्यातील भाळवणी येथे ९५० वर्षांपूर्वीच चालुक्यकालीन हळळे कन्नड लिपीतील शिलालेख सापडला असून यामुळे प्राचीन इतिहासावर नव्याने प्रकाश पडणार आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी या शिलालेखाचे संशोधन केले आहे.
  • चालुक्य राजा सोमेश्वर (दुसरा) उर्फ भुवनकमल्ल याच्या राजवटीत भाळवणी येथील प्राचीन जैन बस्तीचा जीर्णोध्दार गावातील तत्कालीन शेतकरी व व्यापाऱ्यांनी करुन या बस्तीसाठी जमीन, फुलांची बाग व दुकानातील उत्पन्न दान दिल्याचा हा लेख आहे.
  • खानापूर तालुक्यातील भाळवणी हे प्राचीन काळापासून प्रसिध्द गाव आहे
  • हा शिलालेख चालुक्यराजा सोमेश्वर (दुसरा) याच्या राजवटीतला आहे. या शिलालेखातील दान हे २० फेब्रुवारी १०७० रोजी देण्यात आले आहेत. यामध्ये सोमेश्वराला समस्त भुवनाश्रय, श्री पृथ्वीवल्लभ महाराजधिराज, परमेश्वरम, परमभट्टारक, सत्याश्रय, कुळतिळक, चालुक्यभरणम, भुवनक्यमल्ल अशा पदव्या लावण्यात आल्या आहेत.

उच्च शिक्षण संस्थांत आयआयटी मद्रास अव्वल

  • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तयार केलेल्या उच्च शिक्षण संस्थांच्या राष्ट्रीय मानांकनात भारतीय तंत्रज्ञान संस्था-मद्रासने (आयआयटी) अव्वल स्थान पटकावले आहे. या यादीत बेंगळुरूची भारतीय विज्ञान संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स), आणि आयआयटी दिल्ली अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या दहा संस्थांमध्ये सात आयआयटी असून, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचाही (जेएनयू) समावेश या यादीत आहे. जेएनयूचा सातवा क्रमांक असून, बनारस हिंदू विद्यापीठ दहाव्या क्रमांकावर आहे.
  • दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाउस हे देशातील सर्वोत्तम महाविद्यालय आहे. याच विद्यापीठातील सेंट स्टीफन्स कॉलेज चौथ्या क्रमांकावर आहे. सन २०१६पासून मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने उच्च शिक्षण संस्थांची मानांकन यादी जाहीर करण्यात येते.
  • पहिल्या दहा सर्वोच्च अभियांत्रिकी संस्थांमध्ये आयआयटी मद्रास सर्वोच्च स्थानी आहे. त्यापाठोपाठ दिल्ली आणि मुंबई आयआयटींचा क्रमांक लागतो. पहिल्या दहा सर्वोत्तम व्यवस्थापन संस्थांमध्ये आयआयएम बेंगळुरू पहिल्या क्रमांकावर आहे. त्या पाठोपाठ आयआयटी दिल्ली, मुंबई आणि रूरकी यांचा क्रमांक आहे.

राष्ट्रीय क्रमवारीत अभिमत विद्यापीठांचीच सरशी

  • राज्यातील उच्च आणि तंत्रशिक्षणातील शासकीय विद्यापीठे आणि संस्थांची यथातथा परिस्थिती शिक्षणसंस्थांच्या राष्ट्रीय क्रमवारीतून समोर आली आहे. यंदाही राज्यातील अभिमत विद्यापीठे आणि केंद्रीय विद्यापीठेच सरस ठरली आहेत. नाही म्हणायला राज्य विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात दहावे स्थान राखले आहे.
  • मुंबई विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला प्रथमच पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये स्थान मिळाले आहे.
  • विद्यापीठांमध्ये पहिल्या १०० विद्यापीठांत राज्यातील १२ विद्यापीठे आहेत. त्यामध्ये अभिमत विद्यापीठे आणि खासगी विद्यापीठांचाच वरचष्मा आहे. शासकीय विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला दहावे स्थान मिळाले आहे. पहिल्यांदाच मुंबई विद्यापीठ (८१) आणि औरंगाबाद विद्यापीठाचा (८२) पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये समावेश झाला आहे. गेल्यावर्षी स्थान मिळवलेल्या राज्यातील संस्थांची क्रमवारीही यंदा घसरली आहे.
  • महाविद्यालयांमध्ये पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय, पुण्यातील राजीव गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी या संस्थेला, मुंबईतील सेंट झेविअर्स या महाविद्यालयांना पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळाले आहे.
Share This Article