⁠  ⁠

चालू घडामोडी : ०९ एप्रिल २०२१

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

वर्धा : डॉ. गगने यांची भारत सरकारच्या फेलोशिपसाठी निवडnitin gangne

वर्धामधील सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थानचे अधिष्ठाता आणि पॅथॉलॉजीचे प्राचार्य नितीन गगणे यांची भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्स (इंडिया) द्वारा अॅकॅडमी ऑफ मेडिकल सायन्स फेलोशिपसाठी निवड करण्यात आली आहे.
फेलोशिप आणि स्क्रोलच्या पुरस्कारासाठी औपचारिक प्रवेश २१ एप्रिल रोजी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्ध यांच्या हस्ते होणार आहे.
नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्स (इंडिया) ची स्थापना १९६१ मध्ये झाली आणि त्याचे उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले.
१९६३ पासून निवडक व्यक्तींना आढावा प्रक्रियेद्वारे आणि सर्व सदस्यांकडून अंतिम मतदानाद्वारे फेलोशिप दिली जाते.
वैद्यकीय शास्त्राचे आणि देशातील सर्व भागातील विविध विषयांचे प्रतिनिधित्व करतात. सध्या देशभरातून ९०० फेलो आहेत आणि त्यात कुलगुरू, राष्ट्रीय महत्त्व असणारे संस्था प्रमुख, एम्स, प्रख्यात क्लिनिक यांचा समावेश आहे.
दरवर्षी २० ते २५ नवीन सहकारी निवडले जातात. सध्या महाराष्ट्रातून ५८ फेलोशिप आहेत.

भारताचे हरेंद्र सिंग अमेरिकेचे हॉकी प्रशिक्षकHarendra Singh

भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांची अमेरिका हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
२०१२ मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या हरेंद्र सिंग यांनी २०१७ ते २०१८ या कालावधीत भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले होते. त्याआधी त्यांनी महिला संघाचे प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी निभावली होती.
२०१८च्या आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी पहिल्याच स्पर्धेत देशाला सुवर्णपदक जिंकून दिले होते.
त्याचबरोबर भुवनेश्वर येथे झालेल्या २०१८च्या विश्वचषक स्पर्धेत हरेंद्र यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तसेच २०१८ चॅम्पियन्स करंडक आणि २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने कांस्यपदकाची कमाई केली होती.
हरेंद्र यांनी महिला संघाला २०१७च्या आशिया चषकात सुवर्णपदक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता

सहारा वाळवंटावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘हरित भिंत’sahara

सहारा डेझर्ट – जगातील सर्वात मोठ्या वाळवंटाचा म्हणजेच सहारा डेझर्टचा आकार दिवसेंदिवस वाढत चालत असल्याने या वाढत्या वाळवंटावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मोठी हरित भींत उभारण्याचा प्रकल्प सध्या सुरू आहे.
ग्रेट ग्रीन वॉल नावाने ओळखली जाणारी ही भिंत पंधरा किलोमीटर रुंद आणि चार हजार किलोमीटर लांब असणार आहे.
गेल्या शंभर वर्षांच्या कालावधीमध्ये सहारा वाळवंटाचे क्षेत्रफळ दहा टक्‍क्‍याने वाढले आहे.
आफ्रिकेतील 11 देशांमध्ये सहारा वाळवंट पसरलेले आहे. हे क्षेत्रफळ दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. सहारा वाळवंटला जोडणारे अनेक प्रदेश दिवसेंदिवस कोरडे आणि जलहिन बनतत चालले आहेत.
या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 2007 मध्ये आफ्रिकी संघाने एका विशेष प्रोजेक्‍टला सुरुवात केली होती. त्याप्रमाणे या वाढत्या वाळवंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी एका हरित भिंतीची उभारणी करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला होता.
पश्‍चिम आफ्रिकेतील सेनेगल आणि पूर्व आफ्रिकेतील जिबूती या देशांच्या मध्ये शंभर दशलक्ष हेक्‍टर क्षेत्रामध्ये वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे.

Share This Article