Current Affairs 09 March 2020
महाराष्ट्राच्या रश्मी उर्ध्वरेषे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘नारी शक्ती’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
ऑटोमोबाईल क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुणे येथील रश्मी उर्ध्वरेषे यांना ‘नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने जागतिक महिलादिनानिमीत्त राष्ट्रपतीभवनाच्या सांस्कृतिक केंद्रात ‘नारीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार-2019’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
महिलांच्या सक्षमीकरणात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देशातील 16 महिला व संस्थाना यावेळी नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून रश्मी उर्ध्वरेषे यांना ऑटोमोबाईल क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.
रश्मी उर्ध्वरेषे, या गेल्या 36 वर्षांपासून ऑटोमोबाईल आणि संशोधन व विकास क्षेत्रात कार्यरत असून केंद्रसरकार संचालित ‘ऑटोमोटिव्ह रीसर्च ऑफ इंडिया’ (एआरएआए) संस्थेच्या वर्ष 2014 पासून त्या अध्यक्ष आहेत. त्यांनी महिला सक्षमीकरण आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात महिलांचा टक्का वाढविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. नुकतेच पुणे जिल्ह्यातील चाकण येथे उभारण्यात आलेल्या हरित वाहतुकीला समर्पित देशातील पहिल्या ‘सेंटर ऑफ एक्सलंस’ च्या निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. राष्ट्रीय ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान संग्रहालय उभारण्यातही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. ऑटोमोटिव्ह क्षेत्रात त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना मानाच्या नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्याचबरोबर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीय हवाईदलामध्ये सामील झालेल्या पहिल्या महिला पायलट टीम भावना कांत,
मोहना जितरवाल आणि अवनी चतुर्वेदी यांचा नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरव केला.
२०१८ साली भारतीय हवाईदलात महिला फायटर पायलट म्हणून रुजू झालेल्या मोहना जितरवाल, अवनी चतुर्वेदी आणि भावना कांत यांना नारी शक्ती पुरस्कारानं गौरविण्यात आलं. या तिघींनीही २०१८ मध्ये मिग २१ विमानासहीत हवेत झेप घेण्याची कामगिरी केली होती.
मान कौर यांनाही हा पुरस्कार देण्यात आला. त्या वयाच्या ९३ व्या वर्षीय मुलासोबत धावायला सुरुवात केली होती. १०० वर्षांवरील वयोगटात त्यांनी जगभर ३० हून अधिक सुवर्णपदके पटकावली.
कंपनी बोर्डमध्ये महिला; भारताला १२ वे स्थान
कंपन्यांच्या संचालक मंडळांवर महिलांना स्थान देणाऱ्या देशांमध्ये भारत १२ व्या स्थानी आहे. माय हायरिंग क्लब डॉट कॉम आणि सरकारी नोकरी डॉट इन्फो यांच्या वतीने हे असे सर्वेक्षण करण्यात अाले.त्यात ही माहिती समोर आली.भारतासह ३६ देशांच्या ७,८२४ कंपन्यांचा समावेश होता.
महिला टी-20 वर्ल्डकप : ऑस्ट्रेलियाला पाचव्यांदा विजेतेपद
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करत पाचव्यांदा विजेतेपद मिळवले.
आयसीसीद्वारे आयोजित महिला वनडे वर्ल्ड कप आणि टी-२० वर्ल्ड कप स्पर्धांचा विचार केल्यास ऑस्ट्रेलियाच्या संघाने आतापर्यंत ११ विजेतेपद मिळवली आहे.
महिला वनडे वर्ल्ड कपला १९७३ साली सुरूवात झाली. त्यानंतर आतापर्यंत ११ वर्ल्ड कप स्पर्धा झाल्या आहेत. यापैकी सर्वाधिक विजेतेपद ऑस्ट्रेलियाने मिळवली आहेत. ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्ड कपची ६ विजेतेपद मिळवली आहेत.
सर्व प्रथम त्यांनी १९७८ साली दुसऱ्या वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर १९८२ आणि १९८८ अशी सलग तीन विजेतेपद मिळवून ऑस्ट्रेलियाने हॅटट्रिक केली. त्यानंतर १९९७, २००५ मध्ये आणि २०१३ मध्ये भारतात झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद त्यांनी मिळवले होते.
वनडे वर्ल्ड कपमध्ये दोन उपविजेतेपद देखील त्यांच्या नावावर आहेत. २००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.