⁠  ⁠

चालू घडामोडी – १ मे २०१६

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 5 Min Read
5 Min Read

देश-विदेश

नौदलप्रमुखपदाची सूत्रे सुनील लांबा यांनी स्वीकारली
# नौदलाचे प्रमुख म्हणून अ‍ॅडमिरल सुनील लांबा यांनी सूत्रे हाती घेतली. देशाची सागरी सुरक्षा आणखी मजबूत केली जाईल, असे त्यांनी या वेळी सांगितले. नौदलातील दिशादर्शन व इतर तंत्रात पारंगत असलेले लांबा यांना तीन वर्षांचा कालावधी नौदलप्रमुख म्हणून मिळणार आहे. अ‍ॅडमिरल आर.के.धोवन निवृत्त झाल्याने त्यांची जागा लांबा यांनी घेतली आहे.

यूपीएससीच्या सदस्यपदी बी.एस. बस्सी
# दिल्ली पोलिस आयुक्तपदी वादग्रस्त कार्यकाळ घालविल्यानंतर आता बी.एस. बस्सी यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारने 60 वर्षीय बस्सी यांची या जागेवर निवड केल्याचे जाहीर केले असून, आता ते यूपीएससीमधील दहा सदस्यांपैकी एक असतील. अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश केडरच्या 1977 च्या बॅचचे आयपीएस ऑफिसर आहेत. फेब्रुवारीत ते दिल्ली पोलिस प्रमुख या पदावरून निवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्र

शेतमजुराचा मुलगा नासात शास्त्रज्ञ
# श्रीगोंदे तालुक्यात शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील तरुण कष्ट करत शिकला व स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या जोरावर रसायन अभियंता (बीई) झाला व आता त्याची अमेरिकेतील ‘नासा’ संस्थेत कनिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. महेश जांभळे असे या तरुणाचे नाव. हिंद सेवा मंडळाच्या दादा चौधरी विद्यालयाचा तो माजी विद्यार्थी.

राज्यात 20 ज्ञानमंडळांची स्थापना
# विश्वकोशातील कालबाह्य नोंदींमध्ये सुधारणा करून आणि त्यात नवीन संकल्पना, विचारप्रवाहांच्या नोंदींची भर घालून विश्वकोशाचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. तसेच यासाठी राज्य मराठी विश्वकोश मंडळाकडून राज्यभरातील विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने पहिल्या टप्प्यात 20 ज्ञानमंडळांची स्थापना करण्यात आली आहे. मराठी विश्वकोशाच्या संकल्पित 23 खंडापैकी 20 खंड प्रकाशित झाले आहेत. मात्र ते पूर्ण करण्यास लागलेल्या प्रदीर्घ कालावधीमुळे यातील अनेक नोंदी कालबाह्य झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 20 ज्ञानमंडळे स्थापन करण्यात आली असल्याची माहिती राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर यांनी दिली.

राज्य कामगार विमा योजनेचे महामंडळात रूपांतर
# केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील राज्य कामगार विमा महामंडळाकडून चालविण्यात येणाऱ्या राज्य कामगार विमा योजनेचे राज्य कामगार विमा महामंडळात रूपांतर करण्यास (दि.31 मे) रोजी झालेल्या राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेचा लाभ 24 लाख कामगारांना देण्यात येतो.महाराष्ट्र राज्यात राज्य कामगार विमा योजना 1954 पासून लागू करण्यात आली आहे.औद्योगिक क्षेत्रातील ज्या कामगारांचे मासिक वेतन 15 हजार रुपयांपर्यंत आहे, अशा कामगारांना ही योजना लागू आहे.तसेच त्यासाठी कामगारांच्या वेतनातून तसेच कारखाना मालकांकडून वर्गणीच्या स्वरूपात महामंडळाकडे रक्कम जमा करण्यात येऊन या योजनेतील विमाधारकांना आर्थिक लाभ आणि वैद्यकीय सेवा पुरविण्यात येतात. राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली असून, 24 लाख नोंदणीकृत विमाधारक आहेत. राज्यात या योजनेची 13 रुग्णालये, 61 सेवा दवाखाने व 506 विमा वैद्यकीय व्यवसायी यांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा दिली जाते.

अर्थव्यवस्था

अर्थव्यवस्थेचा पंचवार्षिक सर्वोत्तम वेग!
# भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत ७.९ टक्के, तर संपूर्ण २०१५-१६ वर्षांसाठी तो ७.६ टक्के राहिला आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातील (जीडीपी) वाढीचा हा दर गेल्या पाच वर्षांतील सर्वोत्तम राहिला आहे. तर जागतिक स्तरावरही सर्वात वेगाने वाढत असलेली अर्थव्यवस्था म्हणून भारताचे स्थान यातून भक्कम बनले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मरगळ असलेल्या निर्मिती क्षेत्राने झेप घेतली असून त्याला कृषी क्षेत्रानेही साथ दिली आहे. परिणामी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने मंगळवारी जाहीर केलल्या आकडेवारीतून, संपूर्ण २०१५-१६ आर्थिक वर्षांत अर्थव्यवस्था ७.६ टक्के दराने वाढल्याचे स्पष्ट झाले. फेब्रुवारीत अंदाजलेल्या दराइतकाच प्रत्यक्ष वृद्धीदर नोंदला गेला आहे.

दिल्लीत ‘सेबी’चे विशेष न्यायालय
# भांडवली बाजार नियंत्रक – ‘सेबी’शी संबंधित तंटे-कज्जांची गतिमान सुनावणी होऊन लवकर तड लागावी यासाठी राजधानी दिल्लीत विशेष सेबी न्यायालयाची स्थापना करण्यात आली. देशभरात स्थापण्यात आलेले हे चौथे विशेष सेबी न्यायालय आहे. २०१४ मध्ये सेबी कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे तीन विशेष न्यायालये कार्यान्वित झाली असून, या मालिकेतील चौथे न्यायालय दिल्लीत स्थपण्याची प्रक्रिया मंगळवारी सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली.

बँक ऑफ बडोदाला राजभाषा पुरस्कार
# रिझव्‍‌र्ह बँकेने घेतलेल्या राजभाषा शील्ड स्पर्धा २०१४-१५ सालचे बँक ऑफ बडोदाने चार पुरस्कार मिळविले. बँकेला ‘अ’ व ‘ब’ क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकाचा, तर ‘क’ क्षेत्रात प्रोत्साहनपर पुरस्कार, तर ‘बॉबमैत्री’ या गृहपत्रिकेने तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला.

क्रीडा

रडवानस्काला पराभवाचा धक्का
# दुसऱ्या मानांकित अग्निझेका रडवानस्काला सात वर्षांनंतर जागतिक क्रमवारीत १०० स्थानावरील खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेतील तिचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीत १०२व्या स्थानावर असलेल्या बल्गेरियाच्या स्वेताना पिरोनकोव्हाने ०-१ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना २-६, ६-३, ६-३ असा विजय मिळवत धक्कादायक निकालाची नोंद केली. या विजयाबरोबर पिरोनकोव्हाने फ्रेंच खुल्या स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रथमच प्रवेश केला.

सायना नेहवाल दुसऱ्या फेरीत
# भारताच्या सायना नेहवालने नऊ लाख अमेरिकन डॉलर पारितोषिक रकमेच्या इंडोनेशिया सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पध्रेला शानदार प्रारंभ करताना चायनीज तैपेईच्या पै यू पो हिचा पराभव केला.

TAGGED:
Share This Article