⁠
Uncategorized

चालू घडामोडी – १० ऑगस्ट २०१६

देश-विदेश

सरकार साठवलेला कांदा बाजारभावाने विकत घेणार
# कांद्याच्या घसरलेल्या किंमतीवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला यश आले आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार केंद्र सरकार कांद्याच्या खरेदीसाठी लवकरच निविदा काढणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचा गोदामात साठवलेला प्रत्येकी ५० टक्के कांदा विकत घेणार आहेत. या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक, पुण्यासह गुजरात मध्य प्रदेशात झालेले कांद्याचे विक्रमी उत्पादन, संततधार पावसामुळे साठवणुकीवरील मर्यादा आणि पुढील महिन्यात येणाऱ्या नव्या पिकामुळे बाजारात कांद्याचा भाव गडगडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आलेल्या बैठकीला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, विद्यमान केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग, महाराष्ट्राचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, सदाभाऊ खोत , केंद्रीय मंत्री सुभाष भामरे आणि महाराष्ट्रातील खासदार उपस्थित होते.

महाराष्ट्र

‘आकाशवाणी पुणे’चा प्रादेशिक वृत्त विभाग बंद होणार
# आजही अनेकांचा दिवस उजाडतो तो आकाशवाणीच्या चिरपरिचित संगीताने. पुण्याच्या आकाशवाणी केंद्रावरून सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी प्रसारित केल्या जाणाऱ्या बातम्यांची वेळ साधून अनेक जण आपापली घडय़ाळे लावतात आणि ‘विविध भारती’वर तासातासाला दिल्या जाणाऱ्या बातमीपत्रांच्या वेळीही श्रोत्यांचा घडय़ाळ तपासून पाहण्याचा ‘सिलसिला’ सुरूच राहतो. पुणेकरांच्या लाडक्या आकाशवाणीचा प्रादेशिक वृत्त विभागच आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सकाळी ७. १० वाजताच्या बातम्या आता पुण्याहून प्रसारित न होता मुंबईहून प्रसारित होणार असून विविध भारतीच्या पुणे केंद्रावरील दोन मिनिटांची बातमीपत्रेही बंद होणार आहेत.

अर्थव्यवस्था

ई-कॉमर्स क्षेत्रातील नियमांचा सरकारकडून आढावा
# नवी दिल्ली: जगभरात वेगाने विस्तारणाऱ्या ई-कॉमर्स क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणूकीसंबंधीचे(एफडीआय) नियम व संबंधित इतर काही विषयांचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने विशेष समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणाऱ्या समितीत वाणिज्य उद्योग मंत्रालय, तसेच इलेक्ट्रॉनिक्स व आयटी विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्र व कर्नाटकसह आणखी दोन राज्यांमधील प्रतिनिधींचादेखील यात समावेश आहे. ई-कॉमर्स कंपन्यांकडून होणारी औषधविक्रीदेखील हादेखील विषय चर्चेसाठी घेतला जाणार आहे.

क्रीडा

फेल्प्सचा ७० मिनिटांत दोन सुवर्णपदकांवर कब्जा
# अमेरिकेचा अव्वल जलतरणपटू मायकेल फेल्प्स याने बुधवारी २०० मीटर बटरफ्लाय आणि ४x२०० फ्री स्टाईल प्रकारात सुवर्ण पदक मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला. फेल्प्सने ७० मिनिटांत दोन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सुवर्णपदक मिळविण्याची किमया साधली. २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात फेल्प्सने रिओ ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक सुवर्णपदक मिळवले तर त्यानंतर तासभराने झालेल्या ४x२०० फ्री स्टाईल प्रकारात त्याने आपल्या साथीदारांसह सोनेरी कामगिरी केली. या सुवर्णपदकासह फेल्प्सच्या ऑलिम्पिकमधील एकुण पदकांची संख्या २५ वर पोहोचली आहे. यामध्ये २१ सुवर्णपदकांचा समावेश आहे. फेल्प्सला सोमवारी झालेल्या ४x१०० मी. फ्री-स्टाईल रिले प्रकारात सुवर्णपदक मिळाले होते. २१ सुवर्णपदकांसह २५ पदकांची कमाई करणारा फेल्प्स हा जगातील पहिलाच जलतरणपटू ठरला आहे. फेल्प्स हा पाचव्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाला आहे.

‘आयर्न लेडी’ कॅटनिका होजूची सुवर्णची हॅट्ट्रीक
# रिओ – जलतरणातील ‘आयर्न लेडी‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हंगेरीच्या कॅटनिका होजूने जलतरणात तिसरे सुवर्णपदक मिळवीत हॅट्ट्रीक केली आहे. 27 वर्षीय होजूने हंगेरीला रिओ ऑलिंपिकध्ये गेल्या चार दिवसांत तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. अमेरिकेने रिओ ऑलिंपिक स्पर्धेच्या जलतरण क्रीडा प्रकारातील वर्चस्व तिसऱ्याही दिवशी कायम ठेवत दोन सुवर्णपदके जिंकले. मायकेल फेल्प्सने आजही दोन सुवर्णपदके मिळवीत कारकिर्दीत 21 सुवर्णपदके मिळविण्याची कामगिरी केली. पण, महिलांमध्ये कॅटनिका होजूनेही आपल्या कामगिरीने जगाचे लक्ष वेधले आहे.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]

Related Articles

Back to top button