Uncategorized
चालू घडामोडी : १० ऑगस्ट २०२०
Current Affairs 10 August 2020
महिंदा राजपक्षे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान
- श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून महिंदा राजपक्षे यांचा शतकांपूर्वीच्या जुन्या बौद्ध मंदिरात शपथविधी झाला. त्यांच्या पक्षाला संसदीय निवडणकीत मोठे बहुमत मिळाले असून पुढील पाच वर्षांसाठी त्यांनी सत्तेवर पकड घट्ट केली आहे.
- माजी अध्यक्ष असलेले ७४ वर्षीय राजपक्षे हे श्रीलंका पीपल्स पार्टीचे नेते असून त्यांना त्यांचे बंधू व अध्यक्ष गोतबया राजपक्षे यांनी शपथ दिली. महिंदा राजपक्षे हे चौथ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. लोकांनी मला सेवेची पुन्हा संधी दिली याबाबत मी ऋणी आहे असे त्यांनी शपथविधीनंतर म्हटले आहे.
RBI ने बुडीत कर्जाची समस्या सोडविण्यासाठी एक समिती नेमली
- भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) कोविड-19 महामारीच्या काळात टाळेबंदी लागू केल्यामुळे झालेल्या नुकसानीमधून निर्माण झालेली बुडीत कर्जाची समस्या सोडविण्यात व्यवहारिक निकष ठरविण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमली आहे.
- के. व्ही. कामत हे समितीचे अध्यक्ष आहेत. ही तज्ज्ञ समिती प्रस्तावित योजनांमध्ये तातडीने अनिवार्य असलेल्या आर्थिक बाबींच्या संदर्भात शिफारसी करण्यात येणार आहे.
- RBIने ‘रिझोल्यूशन फ्रेमवर्क फॉर कोविड-19-रिलेटेड स्ट्रेस’ जाहीर केले आहे. हे दस्तऐवज संकटात आलेल्या मालमत्तेसंबंधी समस्येच्या निराकरणासाठी एक मार्गदर्शक आहे.
- सप्टेंबर 2019 अखेर बँकांच्या अनुत्पादित कर्जाचे (NPA) प्रमाण 9.3 टक्क्यांवरून सप्टेंबर 2020 पर्यंत 9.9 टक्क्यांवर जाणार, असा इशारा RBIच्या एका वित्तीय स्थैर्य अहवालात देण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या ढोबळ थकीत कर्जाचे प्रमाण वाढून सप्टेंबर 2020 महिन्याच्या अखेरीस 13.2 टक्के तर खासगी बँकांच्या बाबतीत हे प्रमाण 4.2 टक्क्यांपर्यंत वाढणार, असा अंदाज आहे.
ICC Test Rankings
- ICC ने जाहीर केलेल्या नव्या यादीत कसोटी अष्टपैलूंमध्ये टॉप १० मध्ये इंग्लंडच्या तीन खेळाडूंना जागा मिळाली आहे.
- बेन स्टोक्स अव्वलस्थानी कायम आहे. ख्रिस वोक्सने २ स्थानांची बढती घेत ७ वे स्थान पटकावले आहे.
- तर स्टुअर्ट ब्रॉड एका स्थानाच्या बढतीसह १०व्या क्रमांकावर आहे. जाडेजा (३) आणि अश्विन (५) टॉप ५मधील स्थान राखून आहेत.
- गोलंदाजांच्या यादीत पहिल्या ९ स्थानांत कोणताही बदल झालेला नाही. दहाव्या स्थानी पाकिस्तानचा मोहम्मद अब्बास संयुक्तपणे विराजमान झाला आहे. फलंदाजांच्या यादीत बेन स्टोक्स तिसऱ्या क्रमांकावरून ७व्या क्रमांकावर गेला आहे. तर केन विल्यमसन आणि डेव्हिड वॉर्नर यांना बढती मिळाली असून ते अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.
१०१ संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर २०२४ पर्यंत बंदी
- देशाला संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने १०१ संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर २०२४ सालापर्यंत बंदी घालण्याची घोषणा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केली.
- त्यामध्ये हलक्या वजनाची लढाऊ हेलिकॉप्टर, वाहतुकीसाठी वापरली जाणारी विमाने, पाणबुड्या तसेच क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.
- राजनाथसिंह म्हणाले, आयातबंदी केलेली ही उत्पादने बनविण्यास देशातील उद्योगांना ५ ते ७ वर्षांत सुमारे चार लाख कोटी रुपयांची कामे दिली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्या प्रयत्नांना बळकटी देण्यास संरक्षण खातेही सज्ज झाले आहे.
- २०२५ सालापर्यंत विविध प्रकारची संरक्षण उत्पादने खरेदी करण्यासाठी १.७५ लाख कोटी खर्च होणार आहेत, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले होते. संरक्षणविषयक खरेदीसंदर्भात येणाऱ्या खर्चाचा आढावा मंत्रालयाने घेतला होता.
- जगातील संरक्षण उत्पादकांसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. गेल्या आठ वर्षांत ज्या तीन देशांनी सर्वाधिक संरक्षण सामग्री आयात केली, त्यामध्ये भारताचा समावेश आहे.
मिझोरामचे राज्यपाल यांनी लॉकडाउन मध्ये 13 पुस्तके लिहिली
- मिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी लॉकडाउनच्या कालावधीमध्ये चक्क 13 पुस्तके लिहून काढली आहेत.
- करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये पिल्लई यांनी पुस्तके आणि कविता लिहिल्या आहेत.
- मार्च महिन्यापासून आतापर्यंत पिल्लई यांनी 13 पुस्तके लिहिली आहेत. यामध्ये इंग्रजी आणि मल्याळम भाषेतील कविता संग्रहाचाही समावेश आहे.
- पिल्लई हे मागील तीन दशकांपासून लिखाण करत आहेत. त्यांचे पहिले पुस्तक 1983 मध्ये प्रकाशित झालं होतं.
- राज्यपाल पदावर नियुक्त होण्याआदी त्यांची 105 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी आतापर्यंत एकूण 121 पुस्तके लिहिली आहेत.