Current Affairs 10 February 2018
1) मानसरोवर यात्रेसाठी नाथुला मार्ग खुला
चीनने पवित्र कैलास मानसरोवर यात्रेसाठी सोईचा ‘नाथुला’ मार्ग पुन्हा एकदा उघडल्याची माहिती केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी दिली. डोकलाम वादानंतर चीनने गतवर्षी नाथुलामार्गे होणारी कैलास मानसरोवर यात्रा रोखून धरली होती. चीनच्या या कृतीमुळे उभय देशांतील वाद अधिकच क्लिष्ट बनला होता. भारताने हा मुद्दा चिनी सरकारपुढे उपस्थित केला होता. विशेषत: परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गत डिसेंबर महिन्यातील आपल्या चीन दौऱ्यात हा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता. या पार्श्वभूमीवर चीनने पुन्हा एकदा नाथुलामार्गे होणाऱ्या मानसरोवर यात्रेला परवानगी दिली आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी गत बुधवारी लोकसभेत एका प्रश्नाला लिखित उत्तर देताना याची माहिती दिली.
2) हिवाळी अाॅलिम्पिक स्पर्धेला सुरुवात
दक्षिण काेरियात २३ व्या हिवाळी अाॅलिम्पिक स्पर्धेला शुक्रवारी सुरुवात झाली. उद््घाटनीय साेहळ्यादरम्यान दक्षिण काेरियाचे राष्ट्रपती मून जाई इन यांनी उत्तर काेरियाचा हुकूमशहा किम जाेंगची बहीण किम याे जाेंगचे स्वागत केले. याप्रसंगी अायअाेसीचे अध्यक्ष थाॅमस बाक उपस्थित हाेते. येत्या २५ फेब्रुवारीपर्यंत रंगणाऱ्या या अाॅलिम्पिक स्पर्धेत ९२ देशांचे संघ सहभागी झाले. २ हजार ९५२ खेळाडू स्पर्धेत १५ खेळांच्या प्रकारात काैशल्य पणास लावतील. यंदाच्या स्पर्धेत अमेरिकेचे सर्वात माेठे पथक सहभागी झाले अाहे. अमेरिकेचे २४२ खेळाडू या स्पर्धेत अापले काैशल्य पणास लावतील. भारताचा २ सदस्यीय संघ या स्पर्धेत सहभागी झाला अाहे. यात अनुभवी अाॅलिम्पियन शिवा केशवनसह जगदीशचा समावेश अाहे.
3) इंदिरा नुई ICC च्या पहिल्या इंडिपेंडेंट महिला डायरेक्टर
पेप्सिकोच्या चेअरमन आणि सीईओ इंदिरा नूई या इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल(ICC) च्या पहिल्या इंडिपेंडेंट महिला डायरेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आल्या आहेत. इंदिरा नुई जून 2018 मध्ये आयसीसीच्या बोर्डमध्ये सहभागी होतील. जून 2017 मध्ये आयसीसीने इंडिपेंडेंट महिला डायरेक्टरच्या नियुक्तीची परवानगी दिली होती. इंदिरा नुईंची नियुक्ती दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे. पण टर्म पूर्ण केल्यानंतर त्यांची पुन्हा नियुक्ती केली जाऊ शकते.
4) माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये आणि उत्तम खोब्रागडे काँग्रेसमध्ये
माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये आणि उत्तम खोब्रागडे यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. या दोघांनीही शुक्रवारी दिल्लीत कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. खोब्रागडे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला होता. बेस्टचे महासंचालक म्हणून खोब्रागडे यांची कारकीर्द वादळी ठरली होती. भारतीय परराष्टÑ सेवेत असलेली त्यांची कन्या देवयानी खोब्रागडे यांच्यावर मोलकरणीचे आर्थिक शोषण केल्यासंदर्भात ठपका ठेवण्यात आला होता.
किशोर गजभिये यांनी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा राजीनामा देऊन खासगी कंपनीत नोकरी पत्करली होती. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मायावतींच्या बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला होता. गजभिये यांचे सामाजिक कार्य मोठे आहे.
5) आरोग्याच्या बाबतीत केरळ सुदृढ व उत्तर प्रदेश हे आजारी राज्य
देशामध्ये केरळचा आरोग्य निर्देशांक सर्वाधिक असून, याबाबत मोठ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश शेवटच्या क्रमांकावर आहे असे नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आरोग्य निर्देशांक अहवालात म्हटले आहे. म्हणजेच आरोग्याच्या बाबतीत केरळ सुदृढ व उत्तर प्रदेश हे आजारी राज्य आहे.
केरळमध्ये आरोग्य निर्देशांक ७६.५५ व उत्तर प्रदेशात ३३.६९ इतका आहे. उत्तर प्रदेशमध्ये आरोग्य निर्देशांकाची स्थिती गेल्या काही वर्षांत काहीशी सुधारली असली तरी यासंदर्भात मोठ्या राज्यांच्या क्रमवारीत अजूनही हे राज्य शेवटच्या क्रमांकावरच आहे. आकाराने मोठ्या राज्यांमध्ये केरळनंतर पंजाब, तामिळनाडू व गुजरात या राज्यांचा आरोग्य निर्देशांक उत्तम आहे. तर उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, ओदिशा या राज्यांत मात्र आरोग्य निर्देशांकाची प्रकृती गंभीर अवस्थेत आहे. मोठ्या राज्यांमध्ये झारखंड, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मिर येथील आरोग्य निर्देशांकामध्ये वृद्धी होत आहे. महाराष्ट्रात आरोग्य निर्देशांकाची स्थिती नेमकी काय आहे याबाबत नीती आयोगाने प्रसारमाध्यमांना माहिती दिलेली नाही.
देशातील छोट्या राज्यांपैकी मिझोरामचा आरोग्य निर्देशांक सर्वात चांगला असून त्यानंतर मणिपूर व गोवा या राज्यांचा क्रमांक लागतो. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले की, देशामध्ये विविध राज्यांत आरोग्यविषयक स्थिती कशी आहे याबाबत आरोग्य निर्देशांक अहवालातून माहिती मिळते. ज्या राज्यांत आरोग्यविषयक स्थिती उत्तम नाही ती सुधारण्यासाठी त्या राज्यांना इतर राज्यांनी मदत करण्याची प्रेरणाही अशा अहवालातून मिळते.
तीन निकषांच्या आधारे झाले सर्वेक्षण
आरोग्य निर्देशांकाठी मोठी राज्ये, छोटी राज्ये, केंद्रशासित प्रदेश असे तीन गट तयार करण्यात आले. प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशातील आरोग्यविषयक स्थिती, सरकारी यंत्रणांचा कारभार व आरोग्यविषयक माहिती अशा तीन निकषांच्या आधारे अभ्यास करुन हा अहवाल तयार करण्यात आला. नीती आयोगाने केलेल्या आरोग्य निर्देशांक अहवालाला जागतिक बँकेचे सहकार्य लाभले आहे.
MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.